You are currently viewing देवगड जामसंडेवासीयांना, गुढीपाडव्यानिमित्त विकासकामांची विशेष भेट

देवगड जामसंडेवासीयांना, गुढीपाडव्यानिमित्त विकासकामांची विशेष भेट

नवीन नगरपंचायत साहाय्य अनुदान योजनेअंतर्गत सन २०२२/२३ देवगड जामसंडे नगरपंचायतसाठी आमदार श्री. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध

 

देवगड :

 

देवगड जामसंडे शहराला आमदार नितेश राणे व सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विशेष सहकार्यातून नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा अंतर्गत २ कोटी ७५ लाख १ कोटी ९३ लाख असे एकूण ४ कोटी ६८ लाख निधी उपलब्ध झाला असून मागील एका महिन्याच्या कालावधीत ४ कोटी ३५ लाख जिल्हा वार्षिक नगरोत्थान योजनेअंतर्गत असे एकूण ९ कोटी चा भरघोस निधी देवगड जामसंडे शहराला आमदार नितेश राणे व सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्याबद्दल देवगड जामसंडे शहरातील नागरीक तसेच देवगड जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठुकरूल, माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका अॅड. सौ प्रणाली माने यांनी वरील माहीती दिली आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा