वेंगुर्ले :
हिदू धर्माभिमानीच्यावतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन केले होते या शोभा यात्रेत विविध पारंपरिक वेशभूषा केलेली लहान मुले लक्षवेधी ठरत होती.
वेंगुर्ला येथे हिंदू धर्माभिमानी यांच्या वतीने मराठी नववर्षाच्या स्वागताची शोभायात्रा रामेश्वर मंदिर येथून सुरु होऊन शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, गाडीअड्डा, मारुती मंदिर ते पुन्हा रामेश्वर मंदिर कडे येऊन विसर्जित झाली.
वेशभूषा, संत परंपरा , स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्ती, विविध पारंपारिक वेशभूषा शोभायात्रेत सामावेश होता विशेष म्हणजे महिला व पुरुष यांचा एकच पेहराव हा लक्षवेधी ठरत होता.