You are currently viewing कणकवलीत मराठी नववर्ष स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवलीत मराठी नववर्ष स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली

हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्यावतीने बुधवारी कणकवली शहरातून स्वागतयात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या साथीने निघालेल्या स्वागत यात्रेमुळे कनकनगरी दुमदुमून गेली होती. या नववर्ष स्वागत यात्रेतील दशावतारी कलाकार, भारत माता चित्ररथ लक्षवेधी ठरले. महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.

हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काढलेल्या या स्वागत यात्रेचा शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यात्रेत आमदार नीतेश राणे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, नगरसेवक संजय कामतेकर, संजय मालंडकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर, दादा कोरडे, सुशील पारकर, नंदकुमार आरोलकर, सुनील सावंत, वैजयंती करंदीकर, मृणाल ठाकूर, दत्तप्रसाद ठाकूर, प्रतिभा करंबेळकर, हरीश गणपते, संदीप राणे, सत्यविजय जाधव, समर्थ राणे, श्रीधर मुसळे, सूर्यकांत मालवणकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कणकवली शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी झालेल्या या शोभा यात्रेतील सिंधु गर्जना ढोल पथकाने परिसर दणाणून गेला होता. पारंपारिक वेशातील स्त्री, पुरूष आणि भगवे ध्वज, चित्ररथ, वारकरी दिंडी यामुळे कणकवली शहर भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु झालेली शोभायात्रा आप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठमार्गे विद्यामंदिराच्या पटांगणावर पोहचली. शिवारा मंदिराजवळ शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा संस्कृती’ याविषयी विवेक मुताली यांनी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा