३० एप्रिल पर्यंत प्रत्यक्ष सेवा सुरू न झाल्यास १ मे रोजी उपोषण
दोडामार्ग
ग्रामपंचायत कार्यालाये ही डायरेक्ट तालुका व जिल्हा पातळीवर ऑनलाईन कार्यप्रणालीने जोडली जावीत, ग्रामपंचायत कार्यालयातील अनेक कामे ऑनलाईन पूर्ण होवुन ग्रामस्थांना योग्य सुविधा मिळावी यासाठी महा ई नेट सेवा शासनाने मंजूर केली आहे त्याचे काम दोडामार्ग तालुका सोडल्यास इतरत्र युद्धपातळीवर सुरू आहे, दोडामार्ग तालुक्यातील महा ई नेट सेवेची जोडणी करणारा ठेकेदार हा मनमानी करत असून सदरची सेवा प्रत्यक्षपणे ३० एप्रिलपर्यंत सुरू न झाल्यास १ मे पासून पंचायत समिती कार्यालय दोडामार्ग येथें आमरण उपोषण छेडण्याचा इशारा शिवसेना तालुका संघटक गोपाळ गावस यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी दोडामार्ग यांना दिला आहे.
हत्तींचा उपद्रव हा दिवसेंदिवस वाढत असून शासन मात्र ठोस उपाय योजना करण्यास असमर्थ ठरत आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून मोर्ले येथील गोपाळ गवस यांच्या मालकीचा शेतमांगर हत्तींनी जामीनदोस्त केल्याची घटना घडली आहे, शासनाला या ना त्या प्रकारे इशारे देवुनही शासन हत्तीं बाबत उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे मात्र त्याचा त्रास गेली २२ वर्षे तिराळी खोऱ्यातील ग्रामस्थांना भोगावा लागत आहे, हा शेतमांगर हत्तीनी जमिनदोस्त केल्याने गोपाळ गवस यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.