You are currently viewing आचरा येथे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास आजपासून प्रारंभ..

आचरा येथे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास आजपासून प्रारंभ..

रामनवमी उत्सवात रोज रात्री रंगणारा शाही थाटाचा पालखी सोहळा..

 

मालवण / आचरा :

आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास बुधवारी संस्थानी थाटात सुरुवात झाली असून हा उत्सव हनुमान जयंती पर्यंत चालणार आहे. बुधवारी दुपारी ‘जय जय रघुवीर समर्थ’ अशी ललकारी आसमंतात दुमदूमल्या नंतर वाजत गाजत श्रींच्या मंदिरात रघुपतीच्या मूर्तिचे आगमन झाले. त्यानंतर रयतेसाठी नूतन पंचांगाचे वाचन करण्यात आले. आगमननंतर पट्टाभिषिक्त श्री रघुपतीची मुर्तीची स्थापना झाली. रामनवमी उत्सवासाठी रामेश्वर मंदिर व आजुबाजूचा परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. या उत्सवात आपली कला सादर करण्यासाठी कराड, सांगली, सातारा, कोल्हापुर आदी भागातून बँडपथकही दाखल झाले आहे.

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या संस्थानी थाटात साजरा होणारा उत्सव म्हणून या रामनवमी उत्सवाकडे पाहिले जाते. दुपारी रघुपतीची आरती झाल्यावर भक्तगणांसाठी प्रसाद वितरीत करण्यात आला. सायंकाळी शाही थाटात ‘श्री’ च्या पाषाणाला न्हावन घालण्यात आले. त्यानंतर पुराण वाचन करण्यात आले. नंतर श्री च्या दरबारात हजेरी लावलेल्या कलाकारांनी आपली गायन सेवा सादर केली. तसेच रात्री संस्थानाच्या शाही लवाजम्यासह पारंपारीक थाटात श्री विष्णूची मूर्ती, शृंगारलेली पालखीत विराजमान होऊन पालखी श्री रामेश्वर मंदिरा भोवती सोमसूञी प्रदक्षिणा करते. त्यानंतर सभाबुवा ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे किर्तन असा दिनक्रम रोज ललिता पंचमी पर्यंत चालणार आहे.

*रामनवमी उत्सवात विविध संगीत कार्यक्रमांची मेजवानी*

बुधवार दि. २२ रोजी दुपारी रघुपती आरती, सायं. वा. माखन (पुजा) सायं सभामंडपातील पुराण वाचन रोज रात्री श्रींची पालखी सोहळा होणार आहे पालखी सोहळ्या उत्सवाचे किर्तनकार बुवा ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे कीर्तन होणार असून पेटीसाथ श्री. आनंद लिंगायत तबला साथ श्री. अभिषेक भालेकर यांची लाभणार आहे.

शुकवार दि. २४ मार्च रोजी सुधांशु सोमण, मिठबांव यांचे गायन, शनिवार दि. २५ रोजी सायं. ०५.३० वा. गायन कर्यक्रम गायक के अथर्व पिसे यांचे गायन, रविवार दि. २६ रोजी सकाळी १० वाजता दिलीप ठाकूर यांचे गायन ऑर्गनसाथ श्री. भालचंद्र केसकर यांची असणार आहे. सायं. ०५.३० वा. शास्त्रीय गायन कार्यक्रम गायिका सौ. समिक्षा भोबे-काकोडकर गोवा यांचे होणार आहे.

सोमवार दि. २७ मार्च रोजी गायक श्री. व%