*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*
*गुढीपाडवा*
गुढीपाडवा हा आपला सण दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. चैत्र महिना हा मराठी कॅलेंडरचा पहिला महिना आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. त्यालाच आपण गुढी पाडवा म्हणून साजरा करतो. या तारखेपासून चैत्र नवरात्रीला ही सुरुवात होते.
गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. यामध्ये ‘गुढी’ म्हणजे ‘विजय ध्वज’ आणि पाडवा म्हणजे: प्रतिपदा’ तिथी. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवून उभारली जाते.
‘वेदांग ज्योतिष’ या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त गुढी पाडवा आहे. पाडवा, अक्षय तृतीया, दसरा व बलिप्रतिपदा (अर्धा मुहूर्त) हे सण साडेतीन मुहूर्ताचे आहेत.
या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी, साखरपुडा, गृहप्रवेश इत्यादी गोष्टी केल्या जातात.
*गुढीपाडवा सांस्कृृतिक इतिहास आणि आख्यायिका:-*
गुडी पाडव्या बाबतीत बऱ्याच आख्यायिका आहेत त्या म्हणजे:-
१) गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली.
२) या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते.
३ ) शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच कारणामुळे शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक याच दिवशी चालू झाला.
४) पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री रामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले. यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला. त्याला गुढी पाडवा म्हणतात.
५ ) आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले. या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते.
*गुढी पाडव्याचे महत्त्व:-*
गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो. जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, तर आंब्याला मोहोर येतो. या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो. गुढीला सजवण्यात येणार्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे. वातावरणात वाढलेल्या उन्हाची उष्णता कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात. तर या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-पडशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात. असे मानले जात आहे की, वर्षाच्या सुरुवातीला कडू लिंबाचा रस किंवा पानाची वाटून केलेली गोळी खाल्ली तर वर्षभर आजापण येत नाही. असं म्हणून लहान मुलांना ती खायला लावतात.
*गुढीची उभारणी व पूजा:-*
गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा भरजरी साडी छान मिऱ्या काढून गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेच्या गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र ही बसविले जाते.
गुढी उभारायची जागा स्वच्छ करून धुऊन पुसून त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवली जाते. तयार केलीली गुढी दारात, उंच गच्चीवर, किंवा गॅलरीत लावतात. त्या गुढीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात.
निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात. दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरविली जाते.
*नैवेद्य पदार्थ:-*
गुढीपाडवा हा खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी ही ओळखला जाणारा सण आहे. या सणाच्या दिवशी गोडाधोडाचे अनेक पदार्थ नैवेद्य म्हणून बनवण्याची प्रथा आहे जसे श्रीखंड-पुरी, साखर-भात, केशर-भात, खीर-पुरी, बासुंदी-पुरी, भाजी-पुरी, पुरणपोळी, मसालेभात, कोशिंबीर, चटण्या, लोणचे, पापड, अळूवड्या, असा नैवेद्य साग्रसंगीत पद्धतीत तयार केला जातो. कांदा,लसूण पदार्थात वर्ज करतात.
यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, वाडवडिलांचे चरण स्पर्शून आशीर्वाद घेतात. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून ‘संवत्सर पाडवो’, वा ‘उगादी’ म्हणतात. तसेच गोव्यातील रहिवासी कोकणी भाषेत ‘संसार पाडवो’ अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला ‘गुढीपाडवा’ असे संबोधले जाते. सिंधी लोक ‘चेटीचंड’ नावाने या उत्सवाला संबोधतात.
*सांस्कृृतिक इतिहास*
ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे, श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला असे वर्णिले आहे.
प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली व पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरू केली.
ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले.
पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. पार्वतीचे लग्न झाले की माहेरवाशिण म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जातात.
*गुढी उभारणीची प्रथा:-*
गुढी पाडव्याला प्रत्येकाच्या घरी गुढी उभारली जाते तसेच देवालयात ही मंदिराच्या कलशावर गुढी उभारली जाते. ह्या दिवशी देवीला सर्व अलंकारांनी सजवतात. देवळा भोवती पालखी मिरवणूक काढतात. आरती पूजा प्रसाद वाटप आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे संवत्सर फल श्रवण करतात.
संवत्सर फल म्हणजे गुढीपाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे
वर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते.
सूर्याचे बारा राशीतले भ्रमण व त्यावरून वर्तविलेले भविष्य असते. संपूर्ण भविष्य बारा राशीचे देवालयात या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणून गुढीपाडव्याच्या रात्री गावकरी देवळात मोठ्या संखेने हजर असतात. फक्त स्वतःचे व बाराही राशीचे वर्षभराचे भविष्य ऐकण्यासाठी व त्याच प्रमाणे देशाच्या कोणकोणत्या भागात हवामान, पाऊसपाणी, शेती उद्योग अर्थ व्यवस्था भविष्यवाणी श्रवण करून वर्षभरात काळजीपूर्वक व्यवहार करता येईल असा विश्वासाने संवत्सर श्रवणास जमतात.
*या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे:-*
“तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||”
*अर्थ -* तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते. वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करण श्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.
चला तर या गुढीपाडव्याला आपणसुद्धा संवत्सर श्रवण करूया.
*गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🌹🌹*
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
_______________________________
*संवाद मीडिया*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
*संवाद मीडिया*
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————