You are currently viewing अवतार मेहेरबाबांचे महा मौन

अवतार मेहेरबाबांचे महा मौन

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*अवतार मेहेरबाबांचे महा मौन*

 

आज १० जुलै ! अवतार मेहेरबाबांच्या आठवणीत, जगभरातले मेहेरबाबाप्रेमी ९ जुलै च्या रात्री १२ पासून १० जुलै च्या रात्री १२ पर्यंत मौन पाळतात. काय आहे ह्या दिवसाचे वैशिष्ट्य असे तुम्हाला वाटत असेल ! त्यासाठी थोडे लिहावे लागेल. मेहरबाबा हे जन्माने पारशी त्यांच्या वडिलांनी शेहेरियारजीने ईश्वरप्राप्तीसाठी खूप प्रयत्न केले चिला नावाचे ४० दिवसांचे खडतर व्रत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तेंव्हा तुझ्या पोटी ईश्वर जन्म घेणार अशी ईश्वरवाणी झाली होती इ स १८६९ साली २५ फेब्रुवारी ला ससून हॉस्पिटल मध्ये त्यांना पुत्ररत्न झाले ते हेच मेहरबाबा ! मूळनाव मेरवान ! त्यांना पूर्वसंकेतानुसार पाच सद्गुरू लाभले . लोक त्यांचेकडे येऊ लागले मेहेर बाबांनी कधीही कोणताही चमत्कार केला नाही ते म्हणत ,मी प्रेम देण्यासाठी आलो आहे संत गाडगेबाबांना मेहेरबाबाविषयी खूप आदर होता एकदा गाडगेबाबा त्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरला सुद्धा घेऊन गेले होते .अहमदनगर जवळील अरणगाव हे आता मेहेराबाद म्हणून ओळखले जाते बाबानी कुष्ठरोग्यांची दलितांची सेवा केली जगात प्रेमाशिवाय काही नाही असे ते नेहमी म्हणत १० जुलै १९२५ ला त्यांनी अचानक मौन सुरू केले हे मौन फक्त एक वर्षासाठी आहे असे जरी आधी ते म्हणाले असले तरी ते मौन त्यांनी त्यांच्या अंतापर्यंत पाळले ३१ जानेवारी १९६९ मध्ये त्यांनी देहत्याग केला म्हणजे तब्बल ४४ वर्षे मेहेरबाबांचे मौन सुरू होते मौन असूनही त्यांनी अनेकवेळा परदेश् वाऱ्या केल्या जगभरात प्रेमाचा प्रसार केला काही जण त्यांना म्हणत ,बाबा तुम्ही मौन करणार तर जगाला कसे शिकविणार त्यावर बाबा म्हणत मी शिकविण्यासाठी नाही तर लोकांना जागृत करण्यासाठी आलो आहे याआधी किती अवतार झाले .त्यांनी लोकांना शिकविण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ !लोक आपला स्वार्थ विसरले नाहीत ! जगातली भांडणे कमी झाली नाहीत ,एकावेळी प्रेमी लोकांशी बोलतांना ते म्हणाले लोक कसे असतात तर अवताराने– ईश्वराने आपल्यात यावे म्ह्णून वाट पहातात ,प्रार्थना करतात परंतु ईश्वर आला की, त्याला न ओळखता त्याचा छळ केला जातो राम कृष्ण येशू महंमद पैगंबर यांची उदाहरणे पहा सगळ्यांचा छळ झाला परंतु ते निघून गेल्यावर आता त्यांची पूजा केली जाते! जग असेच आहे

बाबा म्हणत माझे मौनच तुम्हाला खूप काही शिकवेल!

खरं आहे ते!मौनात खूप शक्ती असते यावर मेहेरबाबांच्या

मंडळीतील एक बाबाप्रेमींने मला स्वतःला खूप छान शब्दात हे पटवून दिले होते ते म्हणाले की, आई आणि तिचे बाळ या दोघातले नाते सर्वात श्रेष्ठ असते! आई मुलाला किती सांगायचा प्रयत्न करते पण मूल ऐकत नाही मग ती लटकेच त्याच्याशी न बोलण्याचे नाटक करते ,आईचे न बोलणे मुलाला असह्य होते आईने बोलावे म्हणून तो कासावीस होतो तिची मनधरणी करतो . मेहरबाबा म्हणतात, माझे तुम्हा सगळ्यांशी असेच नाते आहे सलग ४४ वर्षे मौन पाळणे ही साधीसुधी गमतीवर नेण्यासारखी गोष्ट नाही सूरवातीच्या काळात ते पाटी लेखणीचा उपयोग करीत , नंतर इंग्रजी आद्याक्षरे असलेल्या पाटीवर बोटे फिरवून संवाद साधत, आणि पुढे तेही सोडून ते हाताच्या बोटांनी खुणा करीत

बाबा नेहमी म्हणत, *Real Happiness lies in making others happy*

अहमदनगर जवळ चे अरणगाव आता मेहेराबादम्हणून ओळखले जाते तेथे मेहेरबाबांचे समाधी आहे कुठेही नारळ दक्षिणा ठेवायची नाही फक्त आपले हृदयपुष्प बाबांना अर्पण करायचे कितीही गर्दी असली तरी तिथे चेंगराचेंगरी नसते सर्वत्र एक गूढ शांतता असते ! त्यांची कुठे गादी नाही गादी चालविणारा वारसदार नाही बाबांवर प्रेम करणारे अखिल जगातले बाबाप्रेमीं हेच त्यांचे वारसदार! जे बाबांचा प्रेमसंदेश देतात आज बाबा हयात नसूनही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे हे आश्चर्य आहे

एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी एकदा तरी पंढरीची वारी करावी आणि मी स्वानुभवाने म्हणींन की एकदा तरी मेहेराबादला जाऊन यावे आणि दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे

आज १० जुलै च्या पावनदिवशी सगळ्यांना मौनदिनाच्या मनापासून शुभेच्छा

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा