You are currently viewing मालवण दांडी येथे आयोजित करण्यात आलेला गाबित महोत्सव अभूतपूर्व असेल !

मालवण दांडी येथे आयोजित करण्यात आलेला गाबित महोत्सव अभूतपूर्व असेल !

माजी आमदार परशुराम तथा जीजी उपरकर यांचे प्रतिपादन

प्रथमच होणाऱ्या गाबित महोत्सवाच्या जय्यत तयारीनिशी अनेक समाज बांधव एकवटले

मुंबई

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. तथापि पर्यटन दुष्टया जिल्ह्यात गाबीत समाजाचे योगदान मोठे आहे. दि. २७ ते ३० एप्रिल या कालावधीत मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावर आयोजित गाबीत महोत्सव आपल्या सर्वांच्या सहभागातून भव्यदिव्य साजरा करायचा असून त्यासाठी मुंबई आणि उपनगरातील सर्व गाबीत समाज शाखांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन,सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी रविवारी गाबित समाज भवन,कांजूरमार्ग पूर्व येथे केले.

गाबीत समाजाच्या सर्व शाखा, समाजसेवक, उद्योजक यांना मार्गदर्शन करताना चंद्रशेखर उपरकर म्हणाले की,
यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमासोबत विविध विषयांवर परिसंवाद याबरोबरच कला , संस्कृती, साहित्य, परंपरा, खाद्यसंस्कृती सोबत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र समित्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या प्रसंगी ‘गाबीत भूषण , पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगितले. चार दिवस होण्याऱ्या या महोत्सवात विविधता नाविन्यपूर्ण असेल . यातून रोजगाराची संधी आणि माहिती उपलब्ध होणार असल्याचे सूतोवाच उपरकर यांनी केले आहे.

जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी आपल्या मार्मिक मनोगतातून आपले विचार मांडताना म्हणाले की,आपला समाज बांधव हा गाबीत महोत्सवाच्या निमित्ताने एकत्रित येत आहेत. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. यापूर्वी देवगडला भव्यदिव्य मोर्चा काढण्यात आला होता तो यशस्वी देखील झाला होता. या घटनेचा आढावा घेत आठवणींना त्यांनी उजाळा दिला.ते म्हणाले, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्याची दखल घेतली होती. त्यानंतर आता मालवण दांडी मध्ये गाबित समाजाचा महोत्सव आयोजित करण्यात येतोय, तो आपण सर्वांनी एकत्रित येऊन समाजातील विविध घटकांना सामावून घेऊन समाजाच्या हितासाठी यशस्वीरीत्या प्रामाणिक प्रयत्न करूया! व आपली परंपरा , संस्कृती जपूया असे भावनिक आवाहन प्रमोद कांदळगावकर यांनी यावेळी केले.
यावेळी, उद्योजक नंदू हरम, कवी दिगंबर गांवकर, गणपत तथा बाळा मणचेकर यांनी मनोगतातून समाज बांधवांबद्दल असलेले प्रेम, व्यथा व्यक्त केली.
अध्यक्षपदावरून बोलताना गाबीत महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी बऱ्याच प्रमुख मुद्दाना व विषयावर हळूवार स्पर्श करताना समाज बांधवांनी आपली मते समोरासमोर येऊन परखड पणे मांडली पाहिजेत, खरं तर मत्स्य व्यवसायाला पर्यटन पूरक व्यवसाय म्हणून स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या महोत्सवात आपणा सर्वांना शासनाच्या सोईसुविधा कशा आत्मसात करता येईल, समाजासाठी काय आवश्यक आहे ही माहिती देखील घेणे आवश्यक आहे.
आणि उद्योग व्यवसायात प्रगती कशी साधली जाईल, यातून गाबित समाज बांधवांचे हित आहे . शासनाच्या विविध उपाय योजनेच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी युवकांना रोजगार मिळावा व मार्गदर्शन व्हावे असा हेतू असल्याचे प्रतिपादन उपरकर यांनी केले.
यावेळी गाबीत समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत यांनी सूत्रसंचालनाद्वारे संपूर्ण कार्यक्रमाची आखणी व रुपरेषा आपल्या प्रास्ताविकातून थोडक्यात मांडली.
यावेळी सरचिटणीस वासुदेव मोंडकर, नारायण आडकर , वामन आडकर उदय आडकर,संदेश उपरकर,भाई चिंदरकर,धर्माजी पराडकर, रत्नकुमार झाजम, प्रल्हाद भाबल आदी मान्यवर उपस्थित होते.

_______________________________

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

_______________________________
*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा