कुडाळ
कुडाळ हायस्कुल ची विद्यार्थिनी कुमारी शमिकाने अरेबियन समुद्रात निवती किनाऱ्यावरून ४० किमी.चे अंतर १० तास ३१ मि.आणि ११ सेकंद या वेळात पोहून पार करत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये आपली छाप उमटवणाऱ्या शमिकाचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री.समीर ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आला.पोहण्याव्यातिरिक्त रांगोळी,पोवाडा ,सायकलिंग अशा बऱ्याच कलांनी परिपूर्ण शमिकाची इच्छाशक्ती आकाशाला गवसणी घालण्याची होती.त्यात आई वडिलांची पावलो पावली मदत ही तिला बहुमोल ठरली.खरोखर असे आई वडील लाभणे ही पण भाग्याची गोष्ट आहे.मार्ग दाखविण्यासाठी मार्गदर्शक गुरूची पण आवश्यकता असते.शमिकाला दीपक सावंत यांनी अचूक मार्गदर्शन करून तिच्या स्वप्नांना वाट दाखवली.शमिका चे वडील श्री.सचिन चिपकर हे जिल्ह्यातील नामांकित घाऊक औषध विक्रेते असून ते कुडाळमध्ये दुर्गा एजन्सी या नावाने औषध व्यवसाय करत असताना आपल्या मुलीसाठी काहीही करण्याच्या त्यांच्या जिद्दीला सलाम.
या सत्कार प्रसंगी सचिव श्री.अभिजीत गुरव,श्री.शेखर कुंभार,श्री.चंद्रकांत भोसले,श्री.असिफ शेख,श्री.अरुण घाडी,श्री.दिपक अनावकर,श्री. जयराम राऊळ,श्री.साहिश अंधारी,श्री.प्रशांत मटकर,श्री.अमोल मुंडये,श्री.राजेश शेलार,श्री.नितीन प्रभू,श्री.धनंजय गवंडे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.