You are currently viewing झाराप पत्रादेवी बायपास सर्व्हिस रोडच्या नुतनीकरणाचे काम सुरू 

झाराप पत्रादेवी बायपास सर्व्हिस रोडच्या नुतनीकरणाचे काम सुरू 

सावंतवाडी

मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासलगत असलेल्या सर्व्हिस रोडलगत टाकण्यात आलेल्या गॅस पाईप लाईनमुळे सर्व्हिस रोडची अक्षरश चाळण झाली होती त्याचे पुन्हा नुतनीकरण करण्यात यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या नुतनीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी प्रत्यक्ष कामावर भेट देऊन कामांची पाहणी करत सूचना केल्या .झाराप पत्रादेवी बायपासच्या बाजूने गतवर्षी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली होती यासाठी महामार्ग लगतचे सर्व्हिस रोड खोदण्यात आले होते तर काही ठिकाणी या गॅस पाईपलाईनसाठी चर खोदताना वापरण्यात आलेल्या जेसीबी तसेच अन्य मशिनरीमुळे सर्व्हिस रोडची पूर्णपणे दुरावस्था झाली होती त्यानंतर पावसळ्यात या खड्डयांमध्ये पाणी साचून अक्षरश रस्त्यांची चाळण झाली होती . त्यामुळे गेले काही महिने कुडाळवरुन सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या सर्व्हिस रोडवर वाहनधारकांना अक्षरश जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत होती त्यामुळे या रस्त्यांचे त्वरित नूतनीकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता .

याबाबत वारंवार महामार्ग प्राधिकरणचे लक्ष वेधण्यात आले होते संबंधित ठेकेदाराने यासाठी लागणारी रक्कम देखील महामार्ग प्राधिकरणकडे जमा केली होती मात्र , याबाबतची मंजुरी नसल्याने गेले काही महिने हे काम रखडले होते शनिवार पासून अखेर या कामाला सुरुवात करण्यात आल्याने स्थानिकांपासून समाधान व्यक्त होत आहे याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता त्यांनी सदरचे काम मंजूर झाले असून लवकरच ते पूर्ण करण्यात येईल अशी माहिती दिली तसेच गॅस पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली असल्यामुळे व्यवस्थित सोलिंग करुन त्यानंतरच डांबरीकरणाचे काम करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =