You are currently viewing इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी तर्फे दिव्यांगांसह गरजूंना जयपुर फूटसह इतर साहित्याचे वितरण

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी तर्फे दिव्यांगांसह गरजूंना जयपुर फूटसह इतर साहित्याचे वितरण

सावंतवाडी

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यावतीने २३ दिव्यांगांसह गरजूंनाजयपूर फूट, हात, सर्जिकल शूज, स्टिक, व्हीलचेअर आणि वॉकरचे मोफत वितरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, वैभववाडी, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, देवगड तालुक्यासह गोव्यातील दिव्यांगांसह गरजूंनी याचा लाभ घेतला . यावेळी इन्हरव्हील क्लबच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, उपाध्यक्षा डॉ शुभदा करमरकर, आयएसओ देवता हावळ, वैभवी शेवडे, सुहासिनी तळेगावकर आदी होत्या. यावेळी दिव्यांगांसह सर्व गरजूंनी इनरव्हील क्लबने केलेल्या या सहकार्यामुळे आपले उर्वरीत जिवन सुखकर होणार असल्याची भावना व्यक्त करून इनरव्हील क्लबचे आभार मानले.

यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दर्शना रासम यानी अशा शिबिरातून अपघातापेक्षा डायबिटीसमुळे अनेक जणांचे पाय काढावे लागतात हे वास्तव पुन्हा एकदा समोर असल्यामुळे यासाठी काळजी घेण्याच्या दृष्टीने लवकरच इनरव्हील क्लबच्यावतीने डायबिटीस अवेअरनेस कॅम्प घेण्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी अपघातात तसेच डायबिटीसमुळे पाय व हात गमावलेल्या दिव्यांगांसह गरजूंना जयपूर फूट, हात, सर्जिकल शूज, स्टिक, व्हीलचेअर आणि वॉकरचे वितरण करण्यात आले.इनरव्हील क्लब हा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेला क्लब आहे. गेल्या ४० वर्षांपासून या क्लबच्यावतीने सावंतवाडी शहर व तालुका परीसरात शैक्षणिक सामजिक आरोग्य आदी समाजपयोगी उपक्रम सातत्याने राबवित आहे. इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने यापूर्वीही २०१८ मध्ये अशाच प्रकारे दिव्यांगांसाठी खास शिबिराचे आयोजन करून ३२ जणांना दिव्यांगांना मोफत जयपुर फूटचे वितरण करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 7 =