You are currently viewing मडुरा सोसायटीची उद्या पंचवार्षिक निवडणूक 

मडुरा सोसायटीची उद्या पंचवार्षिक निवडणूक 

श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनल आणि श्री देवी माऊली आदर्श शेतकरी सहकार उत्कर्ष पॅनल यांच्यात लढत

बांदा

मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक रविवार १९ मार्च रोजी होत आहे. भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनल आणि श्री देवी माऊली आदर्श शेतकरी सहकार उत्कर्ष पॅनल यांच्यात दुरंगी लढत होत आहे. दोन्ही पॅनलकडून निवडणूक प्रचार यंत्रणा यशस्वीपणे राबविल्याने कडवी लढत होण्याची शक्यता आहे.

मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे कार्यक्षेत्र मडुरा, रोणापाल, निगुडे गाव मर्यादित आहे. १३ संचालक संख्या असलेल्या सोसायटीत भाजप पुरस्कृत पॅनलचे अनुसुचित जाती जमाती मतदार संघाचे उमेदवार देवू नवलू कोळापटे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

त्यामुळे १२ संचालक जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संस्थेचे एकूण ९१९९ सभासद मतदार आहेत.भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनलकडून ज्ञानेश पांडुरंग परब, सुरेश गंगाराम गावडे, आत्माराम रा. गावडे, उदय नारायण देऊलकर, लाडू चिंतू परब, दत्ताराम महादेव परब, सुकाजी बापू मोरजकर, शामराव विठ्ठल म्हाडगुत, जयराम मोहन गवंडे, सौ. अर्चना अनिल परब, सौ. सुविधा गुंडू धुरी, पुंडलीक केशव जाधव रिंगणात आहेत. तर श्री देवी माऊली आदर्श शेतकरी सहकार उत्कर्ष पॅनलकडून गोपाळ आपा धुरी, गणेश सिताराम गावडे, वसंत सोमा गावडे, शिवा शांताराम नाईक, सोमा विठ्ठल नाईक, जगन्नाथ महादेव परब, संतोष जगन्नाथ परब, उल्हास उत्तम परब, लक्ष्मी मोहन भाईप, सुनंदा सुरेश परब, राजेश रमेश मयेकर, लिंगाजी सुरेश जाधव हे उमेदवार नशीब आजमावत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 15 =