सिंधुदुर्गनगरी
अबोली योजनेच्या शुभारंभ हे या जिल्ह्यातील ऐतिहासिक घटना असून महिलांना रोजगार देणारी महिलांना रिक्षा व्यवसायात आणून त्यांचे उत्पन्न वाढविणारे रोजगाराचे एक नवे दालन महिलांसाठी या जिल्हा बँकेने निर्माण केले आहे, त्याचा आपल्याला आनंद आहे. काही वर्षांपूर्वी आपले पती केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी महिला भावनांची निर्मिती करून या जिल्ह्यात महिला भवनाची निर्मिती करून रोजगाराचे एक नवीन दालन महिलांसाठी उभे केले होते. ही चळवळ पुढे नेण्यासाठी अन्य महिलांनी या योजनेत सहभागी होऊन महिला रोजगाराची ही चळवळ आणखी बळकट करावी असे आवाहन जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्ष सौ नीलमताई राणे यांनी जिल्हा बँकेच्या अबोली ऑटो रिक्षा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
सिंधुदुर्गातील महिलांसाठी रोजगार देणाऱ्या व महिलांसाठी रोजगाराची एक नवे दालन खुले करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अबोली ऑटो रिक्षा योजनेचा शुभारंभ जिजाऊ महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ निलमताई राणे यांच्या हस्ते शनिवारी जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात झाला. आमदार नितेश राणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप नेते प्रमोद जठार जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे भागीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे बँकेचे संचालक सौ नीता राणे विद्याप्रसाद बांदेकर आत्माराम ओटवणेकर, समीर सावंत, प्रकाश मोर्ये, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देसाई,माजीं सभापती सायली सावंत, सौ सुप्रिया वालावलकर आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हनाले माझा आई म्हणजे नीलम ताई राणे यांनी जिल्ह्यातील महिलांसाठी काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग महिला भावनाची निर्मिती करून महिलांसाठी व्यवसायाचे दालन उभे केले होते. या जिल्ह्यात महिलांना पुढे आणण्यासाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. महिला भाऊनातून बचत गटांचे मार्केटिंग महिलांसाठी गारमेंट इंडस्ट्री असे उपक्रम राबवून या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविताना त्यात महिलांचा सहभाग मोठा असावा ही अपेक्षा ठेवून महिला रोजगाराची चळवळ निर्माण केली होती. आता या चळवळला जिल्हा बँकेच्या या अबोली ऑटो रिक्षा योजनेमुळे आणखी बळकटी मिळेल व महिलांसाठी रोजगाराचे हे आणखी एक निवेदन सुरू होईल असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. या जिल्ह्यात महिलांसाठी रोजगाराची एक चळवळ निर्माण करणाऱ्या आपल्या आईच्या हस्ते जिल्ह्यातील पहिल्या चार आलेल्या या योजनेतील महिला लाभार्थ्यांना रिक्षाच्या किल्ल्या सुपूर्त करण्याचा कार्यक्रम याच मुळे ठरविण्यात आला त्याचा आपल्याला आनंद होत आहे. ही संकल्पना प्रसाद देवधर यांनी सुचविली व त्याचे अंमलबजावणी तात्काळ झाली. आजची ही ऐतिहासिक घटना आहे. आज चार रिक्षांचे वितरण होत असले तरीही लगेचच्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी महिलांच्या हातात रिक्षा दिसतील व महिलांसाठी रोजगाराचे हे नवीन दालन उपलब्ध होईल यासाठी ही जिल्हा बँक त्यांच्या सदैव पाठीशी राहील अशोक भाई आमदार नितेश राणे यांनी शेवटी दिली.
सिंदूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले या बँकेने जिल्ह्यातील अनेक रोजगार घटकांसाठी मदतीचा हात दिला असून जिल्ह्यातील पशुपालकांसाठी वरदान ठरणारी दुधाळ जनावeरे योजना एक चळवळ म्हणून राबविली आहे. भाजपा नेते नामदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेने दुग्ध उत्पादनात काम करणाऱ्या शेतकरी पशुपालकांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भगीरथ प्रतिष्ठान गोकुळ दूध प्रतिष्ठान यांचीही मदत घेतली आहे. दुग्ध क्रांतीच्या या चळवळीत पाठोपाठ महिलांना अन्य व्यवसायात वाव देणारी अबोली ऑटो रिक्षा योजना आणली जात आहे. पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांच्या हाती आलेल्या या पिंक ऑटो रिक्षा आकर्षण ठरतील व महिलांसाठी रोजगाराचे हे नवीन दालन सुरू होईल अशी अपेक्षाही मनीष दळवी यांनी व्यक्त केली.
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काय शेखर म्हणाले अनेक क्षेत्रात महिलांनी केलेले प्रगती व अनेक व्यवसायात किंवा तंत्रज्ञानात महिलांचे योगदान सांगितले जाते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला ऑटो रिक्षातून प्रवाशांची सफर करताना दिसतील तेव्हा सर्वांना त्यांचे कौतुक करावे लागेल. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा महिलांच्या हातात असलेल्या रिक्षा दिसतील तेव्हा तों क्षण पाहता नाही समाधान वाटेल व त्यातूनच सिंधुदुर्ग बदलतोय सिंधुदुर्ग स्थिरावतोय हे चित्र दिसेल.
भाजपने ते प्रमोद जठार म्हणाले खूपच छान! जिल्हा बँकेने महिलांसाठी राबविलेल्या हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. या योजनेला आपण सिंधूरत्न योजनेतून आणखी मदत करु. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना ऑटो रिक्षासाठी सिंधू रत्न योजनेतून अनुदान देता येईल ते नॉन रिफाइंडेबलही असेल असेही ते म्हणाले. प्रास्ताविकत प्रमोद गावडे यांनी बँकेची वाटचाल व या योजनेची माहिती दिली. शरद सावंत यांनी सूत्र संचालन केल.