कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी मोफत जयपूर फूट मोजमाप शिबिराचे आयोजन..

कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी मोफत जयपूर फूट मोजमाप शिबिराचे आयोजन..

रोटरीच्या इव्हेंट चेअरमन सौ. दिशा अंधारी यांची माहिती..

कणकवली
रविवार १ नोव्हेंबरला कणकवली येथे मोफत जयपूर फूट मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रोटरीच्या इव्हेंट चेअरमन सौ. दिशा अंधारी यांनी दिली. रोटरी लोककल्याण मंडळ कोल्हापूर आणि रोटरी क्लब कणकवलीच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता, रोटरी ऑफिस रेल्वे स्टेशन रोड येथे हे शिबिर होणार आहे. आगाऊ नोंदणी केलेल्या १० लाभार्थ्यांना शिबिर स्थळीच मोफत जयपूर फूट देण्यात येणार आहेत. तर शिबिरात नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना मोजमाप घेतल्यानंतर त्यांच्या मापानुसार बनवून देण्यात जयपूर फूट देण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी दिशा अंधारी मोबा. ७७०९४९७६६७ येथे संपर्क साधण्याचे असिस्टेंट गवर्नर, सीताराम उर्फ दादा कुड़तरकर, प्रेसिडेंट लवू पिळणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा