आ. वैभव नाईक यांची विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मागणी
एखादा नवीन साकव बांधायला घेतला तर त्याला ३५ ते ४० लाख रु खर्च होतात. परंतु जोपर्यंत नवीन साकव होत नाही तोपर्यत जुना साकव तात्पुरता दुरुस्त केला तर ५ ते १० लाख रुपयात तो साकव व्यवस्थित होऊन लोकांना येण्याजाण्यास त्याचा फायदा होऊ शकतो.त्यामुळे मंत्री महोदयांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा साकवांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद केली तर अनेक नादुरुस्त असलेले साकव सुस्थितीत करता येतील.अशी मागणी आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली.
याप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्हा नियोजन मध्ये नवीन साकवांसाठी निधी मंजूर केला आहे.गतवर्षी तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार यांनी नवीन साकवांच्या खर्चासाठी ३५ लाख असलेली मर्यादा ६५ लाखांपर्यत वाढविली आहे.तर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही त्यावेळी साकव दुरुस्तीसाठी ५० कोटी रु मंजूर केले होते याकडे आ.वैभव नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकवांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी निधीची तरतूद केली तर अनेक नादुरुस्त असलेले साकव सुस्थितीत करता येतील.अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली.