*जिल्हा पोलिस अधीक्षक अनभिज्ञ*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाकी वर्दीच्या मेहेरबानीवर जुगाराच्या मैफिलिंना अच्छे दिन आलेत आणि खाकिचे त्या त्या विभागातील शिलेदार हफ्ते घेऊन मालामाल झालेत. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल मात्र अनभिज्ञच राहिले.
कणकवली तालुक्यातील फोंडा येथील कधी पाण्याच्या टाकीजवळ, कधी पारावरच्या कंपाऊंड मध्ये तर कधी आजगावकर ग्राउंडवर वेंगुर्ल्याच्या सुभल्याचे जुगाराचे अड्डे बसत असून काहीही झाले तरी आपला जुगार सुरूच राहणार अशी दर्पोक्ती सुभल्याने जिल्हाभरातील आलेल्या जुगाऱ्यांसमोर केली आहे. कणकवली रेल्वे स्टेशन नजिक आज मोरजे वरून आलेल्या इसमाची नवीन जुगाराची मैफिल बसली असून “पट डॅडीचा” या नावाने तिची ओळख आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव नानेली येथील डोंगरात गेले दोन महिने बैठक सुरू असून *खि(ई)सा* आणि *(श)मामा* हे दोघे ही बैठक चालवतात. माणगाव पोलिस दुरक्षेत्राच्या हद्दीत सुरू असणाऱ्या जुगारांना जबाबदार कोण…? कोणाची तुंबडी भरल्यावर अवैद्य धंद्यांना परवानगी मिळते…कानाडोळा होतो..? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे मात्र जिल्हाभरातील जुगारांबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दरदिवशी होणारा लाखो रुपयांना जुगाराचा बाजार कधी बंद होणार…?