You are currently viewing मत्स्य शिल्प स्पर्धेत आनंद मेस्त्री प्रथम क्रमांकाचे मानकरी

मत्स्य शिल्प स्पर्धेत आनंद मेस्त्री प्रथम क्रमांकाचे मानकरी

काका सावंत द्वितीय तर आशिष कुंभार तृतीय

सावंतवाडी
सिंधु आत्मनिर्भर अभियान, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून होणाऱ्या मत्स्य महोत्सवानिमित्त मत्स्य शिल्पस्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक कलाकरांकडून अतिशय रेखीव सुंदर अशी सामाजिक संदेश देणारी शिल्प साकारण्यात आली‌ होती.

या स्पर्धेत माणगांव येथील कलाकार आनंद मेस्त्री यांनी प्रथम, माजगांव येथील कलाकार काका सावंत द्वितीय तर आशिष कुंभार यांना तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला. तसेच समिर चांदरकर व रविराज चिपकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आल. या स्पर्धेच परिक्षण विजेंद्र मांजरेकर, ओंकार मांजरेकर यांनी केले. तर या स्पर्धेचे संयोजक नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत यांनी यात महत्वपूर्ण योगदान दिले. महोत्सवाच्या अंतिम दिवशी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

प्रथम क्रमांकाचे मत्स्य शिल्प

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − seventeen =