You are currently viewing केंद्रसरकारची कोरोना लसीकरिता तयारी नसणे ठरेल धोकादायक – राहुल गांधी

केंद्रसरकारची कोरोना लसीकरिता तयारी नसणे ठरेल धोकादायक – राहुल गांधी

 कोरोना संकटावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदी सरकार वर निशाणा साधत आहे. लॉकडाऊनला अयशस्वी म्हणत, राहुल यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रसरकारला घेराव घातला आहे. महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या विधानाने राहुल यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला गुंडाळले आहे.
जागतिक महामारी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव भारतात दिवसेंदिवस अजूनही सुरू आहे. देशात दिवसात अगणिक ७५ हजार कोरोनाबाधित आढळून आले असून, अशा परिस्थितीत प्रत्येकजण कोरोना लसीची वाट पाहत आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कोविडच्या लसीपर्यंत पोचण्याची योग्य आणि समग्र रणनीती आत्तापर्यंत तयार केली गेली पाहिजे. परंतु अद्यापपर्यंत तशी कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. याबाबत भारत सरकारची तयारी नसणे धोकादायक आहे.
‘भारत कोरोनावरील लस उत्पादित करणाऱ्या देशांपैकी एक असेल’ असे एक ट्विट रिट्विट १४ ऑगस्ट रोजी राहुल गांधींनी केले होते. या लसीची उपलब्धता, किंमत आणि वितरण यावर काम करण्यासाठी योग्य रणनीती आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने त्वरित कार्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा