You are currently viewing खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्गातील धरणांचे सर्वेक्षण आणि विंधन विवरयांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्गातील धरणांचे सर्वेक्षण आणि विंधन विवरयांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर

*कामे मंजूर केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी मानले आभार*

 

खासदार विनायक राउत,आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे लघु पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणाच्या कामांचे सर्वेक्षण करून विंधन विवरे घेणे या कामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. त्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी खासदार विनायक राउत, आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

मंजूर करण्यात आलेली कामे पुढीलप्रमाणे आहेत.

ल.पा.यो. पोखरण ता. कुडाळ या योजनेचे सर्वेक्षण करून विंधन विवरे घेणे २७ लाख ९९ हजार,

ल.पा.यो. कडावल (राईकांडा) ता. कुडाळ या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २७ लाख ५२ हजार,

ल.पा.यो. हरकुळ बु. (मोजे तलाव) ता. कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विधन विवरे घेणे २७ लाख ५० हजार,

ल.पा.यो. हरकुळ (खुर्द) ता. कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २७ लाख ४६ हजार,

ल.पा.यो. विठ्ठलादेवी (पटवणेवाडी) ता. देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २६ लाख ७१ हजार,

ल.पा.यो. भिरवंडे (हेल्याचे सखल) ता.कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विधन विवरे घेणे २० लाख ८८ हजार,

ल.पा.यो. शिरगाव (निमीतवाडी) ता.देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विधन विवरे घेणे २० लाख ५६ हजार,

ल.पा.यो. बिडवाडी (गणेशकोड) ता.कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विधन विवरे घेणे २० लाख ३३ हजार,

ल.पा.यो. आंबेरी ता. मालवण या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे १९ लाख ०२ हजार,

ल.पा.यो. नेले ता. वैभववाडी या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २९ लाख ४५ हजार,

ल.पा.यो. शिरवली (महादेववाडी) ता.देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २८ लाख ४६ हजार,

ल.पा.यो. साळशी (तळीचे सखल) ता.देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २७ लाख ०१ हजार,

ल.पा.यो. कडावल (ठाकरटेंब) ता. कुडाळ या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २४ लाख ८५ हजार,

ल.पा.यो. साळशी (देवानेवाडी) ता.देवगड या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २१ लाख ३२ हजार,

ल.पा.यो. करंजे (पिंपळाचीवाडी) ता. कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करून विधन विवरे घेणे २० लाख ९० हजार,

ल.पा.यो. तळवडे (ओळीचे सखल) ता. कणकवली या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे २० लाख ५९ हजार,

ल.पा.यो. गिरगाव ता. कुडाळ या योजनेचे सर्वेक्षण करून विंधन विवरे घेणे २० लाख ०८ हजार,

ल.पा.यो. देवली नवागर ता. मालवण या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे १९ लाख २४ हजार,

ल.पा.यो. आंगणेवाडी (मोडनझरा) ता. मालवण या योजनेचे सर्वेक्षण करुन विंधन विवरे घेणे १७ लाख ९५ हजार ही कामे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती सतीश सावंत यांनी दिली.