You are currently viewing करुळ घाट आजपासून वाहतूकीसाठी सुरू…

करुळ घाट आजपासून वाहतूकीसाठी सुरू…

वैभववाडी

तब्बल दोन आठवड्यांपासून वाहतूकीसाठी बंद असलेला करुळ घाटमार्ग आज पासून सुरू होणार आहे,अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः कहर माजविला होता.या मुसळधार पावसामुळे दोन आठवड्यापूर्वी करुळ घाटात रस्त्याच्या दरीकडील बाजूस असलेल्या मोरीचा कठडा ढासळला.त्यामुळे दुरूस्तीसाठी करुळ घाट मार्ग २६ जुलै पर्यंत बंद करण्यात आला होता.
दरम्यान करुळ घाटात युध्द पातळीवर काम सुरू होते. तर भुईबावडा घाट रस्त्यात भेगा अधिकच रुंदावल्याने कधीही याठिकाणी भुस्सख्खल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा घाटमार्ग सहा महिन्यांसाठी बंद राहणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान आज सायंकाळपासून करुळ घाटातून वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + fifteen =