निगडी, प्राधिकरण-(प्रतिनिधी)
कॅप्टन कदम सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, महिला विभाग यांनी जागतिक महिला दिन साजरा केला.
या कार्यक्रमास ८० – ८५ जणी उपस्थित होत्या. प्रार्थनेने व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. पुनमताई गुजर (मुख्याध्यापिका, पुनरूत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवडगाव, पुणे) यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. पारधी समाज्यातील समस्या व त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांचे अनेक वर्षांपासून चाललेले प्रयत्न आणि त्यांच्या समोरची आव्हाने उपस्थितांना अवगत करून दिली. गुरुकुल पद्धतीवचा अवलंब करून या मुलांना दिले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण, त्यांची पहाटे ४ वाजल्यापासूनची रात्री ११ पर्यंतची दिनचर्या, या मुलामध्ये हळू हळू होणारे बदल याविषयी माहिती सांगितली. या मुलांच्या नंतरच्या पिढीला हिच मुले आपसूकच सुसंकृत नागरिक बनविण्याचा प्रयत्न करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तसेच ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. अंजली घारपुरे (कार्यकारी संचालक, प्रदीप्त भारत फौंडेशन, निगडी प्राधिकरण, पुणे) यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कातकरी समाजातील समस्या, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी केलेले प्रयत्न व त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी तसेच समाजाचा या कार्यास मिळणारा पाठींबा आणि अडचणींवर वेळोवेळी केलेली मात याविषयी माहिती दिली. या मुलांमधील उपजत कला – कौशल्य व ती वृद्धिंगत होण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाच्या सचिव ॲड सौ. हर्षदा पोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ. नेहा साठेयांनी केले. प्रमुख पाहुण्या सौ. पुनमताई गुजर यांचा परिचय मंडळाच्या सदस्या सौ. शुभांगी कवडे यांनी तसेच प्रमुख पाहुण्या सौ. अंजली घारपुरे यांचा परिचय मंडळाच्या सदस्या सौ. वीणा महाजन यांनी करून दिला. मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. अश्विनी अनंतपुरे, सह कार्याध्यक्षा सौ. वैदेही पटवर्धन आणि अध्यक्षा सौ. नेहा साठे यांनी प्रमुख पाहुण्या सौ. पुनमताई गुजर व सौ. अंजली घारपुरे यांचा शाल, श्रीफळ व देणगी देऊन यथोचित सत्कार केला. मंडळाच्या सदस्या मीनल भावे यांनी आभार प्रदर्शन केले.
महिला मंडळ सदस्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली .
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*