You are currently viewing नाबर प्रशालेची दहावीची 100% निकालाची परंपरा कायम

नाबर प्रशालेची दहावीची 100% निकालाची परंपरा कायम

*सर्व विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण*

बांदा :

श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नाबर प्रशालेचा दहावीचा या वर्षी 100 % निकाल लागला. दहावी परीक्षेसाठी एकूण 35 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्या पैकी सर्वच्या सर्व 35 विद्यार्थी विशेष श्रेणीत, उत्तीर्ण झालेत. प्रशालेची कु. युती वसंत राऊळ हिने 96.80% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला. कु. तन्वी मनोज महाबळ हिने 94.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर कु.वैभवी प्रमोद धुरी व कु. संकेत प्रेमानंद देसाई यांनी 94.40% गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तसेच कु. पायल संतोष गावकर हिने 93.20% तर कु. मिताली भालचंद्र कोकाटे हिने 93% गुण मिळवून अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.

संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 10 =