You are currently viewing आंबोली येथील “सिंधू आरोग्य” मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

आंबोली येथील “सिंधू आरोग्य” मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित “सिंधू आरोग्य” मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्घटन सरपंच व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच सावित्री पालेकर,माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.राजेश नवांगुळ,अस्तिरोग तज्ञ डॉ. निखिल अवधूत,डॉ.दीपक लादे, डॉ.वर्षा शिरोडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ.जगदीश पाटील, डॉ.अमोल जेवरे,आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश जाधव, डॉ.आदिती पाटकर आदी उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ.राजेश नवांगुळ यांनी आरोग्य, स्वास्थ, डॉक्टर आणि तपासणी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली. यावेळी ग्रामस्थांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवेचा लाभ घेतला.जिल्हा परिषद फंडा मधून हा मेळावा घेण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =