You are currently viewing शुक्रवार, दिनांक १७ मार्चपासून गणेश व्याख्यानमाला

शुक्रवार, दिनांक १७ मार्चपासून गणेश व्याख्यानमाला

*शुक्रवार, दिनांक १७ मार्चपासून गणेश व्याख्यानमाला*

तळेगाव स्टेशन (दिनांक : १४ मार्च २०२३) शुक्रवार, दिनांक १७ मार्चपासून श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव- दाभाडे (स्टेशन) येथे दररोज सायंकाळी ठीक ६:०० (सहा) वाजता व्याख्याने संपन्न होणार असून मावळचे आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. व्याख्याते राजेंद्र घावटे, महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखाध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, गणेश मोफत वाचनालयाचे अध्यक्ष प्रशांत दिवेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्यानमालेत उपस्थिती राहील. शुक्रवार, दिनांक १७ मार्च २०२३ रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. व. बा. बोधे ‘हास्यमेव जयते!’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफणार असून रोटरी क्लब तळेगाव सिटीचे अध्यक्ष संतोष शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहील. शनिवार, दिनांक १८ मार्च २०२३ रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे ‘भारताचा पत्ता काय?’ या विषयावर आपले विचार मांडणार असून तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ ‘मला भेटलेली माणसे’ या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून गुंफणार असून उद्योजक अशोक काळोखे यांची प्रमुख उपस्थिती राहील. विनाशुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, सचिव दिलीप राजगुरव, उपाध्यक्ष बच्चू तांबोळी आणि खजिनदार प्रा. जीवन पाटील यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर
७४९८१८९६८२
९४२१३०८२०१

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − three =