*एलिस पेरीचे अर्धशतक गेले व्यर्थ*
*दिल्लीने बंगळुरूवर सहा विकेट्सने केली मात*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महिला प्रीमियर लीगच्या ११व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ४ गडी गमावून १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १९.४ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले.
बंगळुरू संघाचा हा सलग पाचवा पराभव आहे. या लीगमध्ये संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही आणि गुणतक्त्यात ते तळाच्या पाचव्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर दिल्ली संघाचा पाच सामन्यांतील हा चौथा विजय ठरला. मुंबईविरुद्धचा एकमेव सामना त्तांनी गमावला आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे आठ अंक आहेत.
प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्ससमोर १५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबीने २० षटकांत चार गडी गमावून १५० धावा केल्या होत्या. बेंगळुरूकडून एलिस पेरीने ५२ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय रिचा घोषने १६ चेंडूत ३७ धावा केल्या. या दोघींशिवाय एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.
बंगळुरूची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्मृती मंधाना पुन्हा एकदा अपयशी ठरली आणि १५ चेंडूत आठ धावा करून बाद झाली. यानंतर सोफी डिव्हाईनही १९ चेंडूत २१ धावा करून बाद झाली. शिखा पांडेने दोघींनाही तंबूमध्ये परत पाठवले. यानंतर १२ चेंडूत ११ धावा केलेल्या हिदर नाईटलाही तारा नॉरिसने बाद केले.
६३ धावांत तीन विकेट पडल्यानंतर पेरी आणि रिचा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघाींनी चौथ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. शिखाला यष्टिरक्षक तानिया भाटियाच्या हाती रिचाने झेलबाद केले. रिचाने या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकार मारले. पेरीने ६७ धावांच्या नाबाद खेळीत चार चौकार आणि पाच षटकार मारले. शेवटच्या पाच षटकात पेरीच्या बळावर आरसीबीने ७० धावा केल्या आणि एक विकेट गमावली. दिल्लीकडून शिखाने तीन आणि नॉरिसने एक विकेट घेतली.
१५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात खराब झाली. शफाली वर्मा पहिल्याच षटकात बाद झाली. मेगन शुटने तिचा त्रिफळा उध्वस्त केला. शफालीला खातेही उघडता आले नाही. यानंतर मेग लॅनिंग आणि अॅलिस कॅप्सीने दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. कॅप्सी २४ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ३८वधावा करून बाद झाली. कर्णधार मेग लॅनिंग काही विशेष करू शकली नाही आणि १८ चेंडूत १५ धावा करून बाद झाली. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि मारिजाने कॅप यांनी चौथ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली.
जेमिमा २८ चेंडूत ३२ धावा करून बाद झाली. यानंतर कॅप आणि जेस जोनासेन यांनी एकत्र येऊन दिल्ली संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी नऊ धावांची गरज होती. रेणुका सिंग पहिल्या दोन चेंडूंवर दोन धावा झाल्या. जोनासेनने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर जोनासेनने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. मारिजाने कॅपने ३२ चेंडूत नाबाद ३२ धावा आणि जोनासेनने १५ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. तिलाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. बंगळुरूकडून आशा शोभनाने दोन गडी बाद केले. त्याचवेळी मेगन शुट आणि प्रीती बोस यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
उद्या मुंबई विरुद्ध गुजरात सामना संध्याकाळी ७:३० वाजता मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईचा संघ गुणतक्त्यातलं अव्वल स्थान कायम राखण्याचा प्रयत्न करेल तर गुजरात आपल्या दुसर्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करेल.
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*