You are currently viewing मोती तलावात उडी घेतलेला तो युवक उभा बाजार येथील

मोती तलावात उडी घेतलेला तो युवक उभा बाजार येथील

मृतदेहाची पटली ओळख : बाबल अल्मेडा टीमने घेतला शोध

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील मोती तलावात सोमवारी उडी घेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास अखेर यश आले. हा युवक उभाबाजार परिसरातील असून प्रविण कमलाकांत केसरकर (४५) अस त्याचे नाव आहे. सांगेली येथील बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमच्या माध्यमातून ही शोध मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला पंचनामा केला.

ओटवणे पुलावर चार चाकी गाडी लावून एका चौकुळ येथील युवकाने आत्महत्या केल्याचा संशय असतानाच सोमवारी दुपारी सावंतवाडी शहरातील मोती तलावात अन्य एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोती तलावाच्या काठावर त्याची दुचाकी व चप्पल आढळून आल्याने त्याने तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला होता.

मोती तलावात असलेल्या स्पीड बोटच्या सहाय्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, काठावर आढळलेली दुचाकी व चप्पल यामुळे सदरचा युवक सावंतवाडी शहरातील प केसरकर नामक युवक असावा असा अंदाजही व्यक्त होत होता. मात्र मृतदेहाचा शोध लागल्यानंतरच त्याची खात्री होणार होती. अखेर सांगली येथील बाबत आल्मेडा रेस्क्यू टीम च्या सहाय्याने मोती तलावातील पाण्यात उतरून शोध घेण्यात आला. मृतदेह सापडल्या नंतर त्याची ओळख पटली.

प्रतिक्रिया व्यक्त करा