You are currently viewing उद्यापासून प्रशासकीय कारभार थांबणार

उद्यापासून प्रशासकीय कारभार थांबणार

कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संपाचे हत्यार;जिल्ह्यात १७ हजार कर्मचारी होणार सहभागी

सिंधुदुर्गनगरी

जुनी पेन्शन सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यानी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारलाआहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद लिपिक संघटना यामध्ये सहभागी होणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी याना निवेदन सादर केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ५६ विभागातील १७ हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे,
सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात बैठक घेऊ राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितिने १४ मार्च रोजीच्या संपाबाबत नियोजन केले आहे. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपालिका आणि नगर परिषद कर्मचारी, जिल्हा महसूल कर्मचारी, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ, जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा नर्सेस फेडरेशन, राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या सर्व संघटना या बेमुदत संपात सहभागी होणार असल्याने ऐंन मार्च अखेर निधी खर्चावर व विकास कामावर याचा परिणाम दिसून येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + nineteen =