You are currently viewing “शिवगर्जना” या नाट्य सोहळ्याच्या निमित्ताने मंत्र्यांचे कुडाळमध्ये होणार दौरे

“शिवगर्जना” या नाट्य सोहळ्याच्या निमित्ताने मंत्र्यांचे कुडाळमध्ये होणार दौरे

कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, नारायण राणे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची राहणार उपस्थिती

 

कुडाळ :

भाजपाचे युवा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ येथे 17 मार्चला होणाऱ्या शिवगर्जना या नाट्य सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, यांच्यासह भाजपाचे बडे नेते तसेच शिवसेनेचेही नेते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची दमदार तयारी कुडाळच्या एसटी स्टँड च्या आवारात सुरू आहे. या सोहळ्याला सुमारे 25 ते 30 हजार लोक गर्दी करतील ही अपेक्षा आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ही कडे कोट ठेवण्यात येणार आहे.

भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग आणि विशाल सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान कुडाळ येथील एसटी डेपोच्या आवारात शिवगर्जना या भव्य नाट्यपुष्पाचे आयोजन करण्यात आला आहे. निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलग दोन दिवस शिवगर्जना हे नाटक रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नाट्य पुष्पाचा मोफत लाभ कोकणवासीयाने मिळणार आहे. शिवगर्जना हे नाटक आशिया खंडातलं सर्वात मोठं नाटक आहे. या नाटकात 700 हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामुळे या नाटकाची उत्सुकता सर्व शिवप्रेमींच्या मनात निर्माण झाले आहे. सर्वांना हे नाटक पाहता यावं यासाठी मोफत प्रवेशिका देण्यात येत आहेत. तसेच ज्यांना या प्रवेशिका मिळणार नाहीत त्यांना सुद्धा या नाटकाचा लाभ घेता येणार आहे.या नाटकाच्या प्रवेशिका मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील सर्व कार्यालय तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडे मोफत पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यांना या नाटकाच्या प्रवेशिका हव्या असतील त्यांनी आपापल्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन विशाल परब यांनी केले आहे.

दरम्यान 17 मार्चला भाजपाचे युवा नेते निलेश राणे यांचा वाढदिवस याच रंगमंचावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास आणि वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्यासह कोकणातील भाजपाचे सर्व आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. हा सोहळा न भूतो न भविष्यती असा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या नाटकाची उत्सुकता संपूर्ण कोकण वासियात पसरले आहे. कारण या नाटकात शिवकाळातील अनेक प्रसंग दाखवण्यात येणार आहे त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मात्र रसिक प्रेक्षकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची शंभर टक्के जबाबदारी आयोजकांनी घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − one =