*माधुरी दीक्षित यांच्या आईचे ९१ व्या वर्षी मुंबईत निधन*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या आईने आज सकाळी ८:४० वाजता अखेरचा श्वास घेत या जगाचा कायमचा निरोप घेतला.
माधुरी दीक्षित यांच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे वय ९१ वर्षे होते. आज सकाळी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. श्रीमती स्नेहलता त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
माधुरी दीक्षित त्यांच्या आईच्या खूप जवळ होत्या. गेल्या वर्षी, जूनमध्ये त्यांच्या आईचा ९० वा वाढदिवस साजरा केला. आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आईची अनेक छायाचित्रं सामायिक केली होती. सोबतच आईसाठी एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला होता. त्यांनी लिहिले- वाढदिवसाच्या शुभेच्छा! असे म्हटले जाते की, आई मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते. हे अगदी बरोबर आहे. तू माझ्यासाठी जे काही केले आहेस, जे काही शिकवले आहेस ते माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे.
माधुरी अनेकदा त्यांच्या आईबद्दल बोलताना दिसल्या आहेत. आईने त्यांना नेहमीच पाठिंबा दिला. पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या आईचे डॉ. श्रीराम नेने आणि त्यांच्या दोन मुलांशीही विशेष नाते होते. आईच्या निधनाने माधुरी यांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब अतिशय दुःखी आहे.