You are currently viewing आंबोली घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत कोसळला – चालक जागीच ठार

आंबोली घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत कोसळला – चालक जागीच ठार

आंबोली

येथील घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक तब्बल दीड हजार फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. ही घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. शंकर मनोहर पाटील (२८) रा. नंदगड-बेळगाव, असे त्याचे नाव आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, मयत शंकर मनोहर पाटील हे बसू नाईक यांच्या मालकीच्या ट्रकने नेहमीच मालवण ते बेळगांव असे चिरे वाहतुक करीत असत. नेहमी प्रमाणे ते शनिवारी रात्री मालवण येथून चिरे भरून रात्रौ ऊशीरा मालवण येथून सुटून रवीवारी पहाटेच्या सुमारास आंबोली घाटात आले. त्यांना कदाचित झोप अनावर झाली अथवा समोरुन येणाऱ्या गाडीची प्रखर लाईट पडली की जेणे करून घाटात बेळगावच्या दिशेने येणारा ट्रक सरळ खाली गेला. ट्रक पडल्या नंतर थोडाफार दिसत होता. त्यामुळे माहीती मिळाली अन्यथा माहीती मिळणे अवघड होते.
आंबोली घाटात धोकादायक दरडींच्या ठिकाणी जाळी लावण्याचे काम गेले महीना भर सुरु असून त्या निमित्ताने हे कामगार आंबोली येथून दररोज घाटात ये जा करीत असतात त्यामुळे त्यांना हा रस्ता, संरक्षक कटडे माहीत झाले आहेत . सोमवारी सकाळी हे कामगार कामावर येत असताना त्यांना मुख्य दरडीच्या खाली आंबोली पासून सावंतवाडी च्या दिशेने साडेचार कि.मी. अंतरावर घाटाच्या बाजुने कटडा तुटलेला दिसला त्यामुळे त्यांनी खाली वाकून पाहीले तर त्यांना ट्रक खाली दिसला त्यांनी लागलीच ही बातमी आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे ठाणे अंमलदार हवालदार दत्तात्रय देसाई यांना सांगितली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता सोबतीला पो. कॉ. राजेश नाईक यांना घेऊन घटना स्थळी जाऊन खात्री केली. आणि वरीष्ठांना संबधीत घटनेची माहीती दिली. त्यानुसार रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा