You are currently viewing वराड गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, माजी खा. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वराड गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, माजी खा. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण

जिल्हा वार्षिक योजनेतून वराड गावात मंजूर झालेल्या ६ विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच शलाका रावले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.

केंद्रियमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या वराड गावातील सावरवाड वराड मुख्य रस्ता डांबरीकरण, वराड वावुळवाडी रस्ता डांबरीकरण, वराड म्हावळुंगेवाडी रस्ता डांबरीकरण, वराड कट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता डांबरीकरण, पालववाडी विजय पालव यांच्या घरात जाणारा रस्ता डांबरीकरण, वराडशेटयेवाडी स्मशानभूमी शेड बांधणे आदी सहा कामांची भूमिपूजन झाली. ही कामे मंजूर होताना वरिष्ठांच्या मार्गर्शनाखाली माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =