You are currently viewing सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलला केसरकर व रविंद्र फाटकांची सदिच्छा भेट…

सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलला केसरकर व रविंद्र फाटकांची सदिच्छा भेट…

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तथा आमदार रविंद्र फाटक यांनी मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ यांनी शाब्दिक, तर प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या भेटीदरम्यान श्री. केसरकर यांना शाळा स्तरावर शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत शालेय समस्या सोडवण्यासाठी आपण निश्चितच सहकार्य करू, या शाळेशी आपले जुने ऋणानुबंध असल्याचे मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.

आदरणीय रवींद्र फाटक यांनी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल करवालो, मिलाग्रीस हायस्कूल व ज्युनि.कॉलेजचे व प्रायमरी चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 12 =