कुणकेरी गावची सुकन्या कु. समृद्धी तानाजी सावंत हिने खास हुडोत्सवा निम्मित गायलेलं गीत रसिकांना भूरळ घालतय, “Niraj Bhosale Official” या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून हे गीत प्रदर्शित करण्यात आले आहे, यूट्यूब वर प्रदर्शित करताच अवघ्या काही तासांत व्ह्यूवर्सने हजारांचा आकडा पार केला. या गीताला संगीतबद्ध समृद्धीचे गुरूवर्य जिल्ह्यातील उत्कृष्ट हार्मोनियम वादक व श्री सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी चे संचालक श्री निलेशजी मेस्त्री यांनी केले तर सौ नीता नितिन सावंत यांनी या गीताचे शब्द लिहिले, या गीताचे रेकॉर्डिंग,मिक्सिंग,मास्टरींग प्रोग्रामिंग मंगेश मेस्त्री व समर्थ केळुसकर यांनी केले, तबला साथ किशोर सावंत, ढोलकी/दिमडी साथ संकेत म्हापणकर, प्रज्योत खडपकर हार्मोनियम साथ निलेश मेस्त्री, साईड रिदम केतकी सावंत, कोरस सिद्धी परब, नितिन धामापूरकर, सर्वेश राऊळ, केतकी सावंत यांनी साथ दिली, या गीताचे चित्रीकरण सर्वेश राऊळ व ओमकार सावंत यांनी केले व संकलन निरज मिलिंद भोसले यांनी केले तर ड्रोन शूटिंग साईनाथ मठकर यांनी केले. या गाण्यासाठी विशेष सहाय्य नितिन सावंत, प्रसन्न प्रभूतेंडुलकर, रामदास गवस, महेंद्र मांजरेकर, यत्वेश राऊळ, सोमेश्वर सावंत, मनीष पवार, श्री सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी व श्री देवी भावई पंचायतन समिती, कुणकेरी यांनी केले.
सर्व स्तरांतून गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून ज्यांना प्रत्यक्ष हुड्याला उपस्थित राहता आले नाही त्यांना घरबसल्या कुणकेरी च्या हुड्याची अनुभूती मिळत आहे अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहे.