बांदा
श्री समर्थ सद्गुरू साटम महाराज यांचा भक्त परिवार हा खुप मोठा आहे. त्यांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेल्या कोकण भूमितील संत शिरोमणी साटम महाराज यांची छोट्या पडद्यावर येऊ घातलेली मालिका ही निश्चितच भक्तांच्या व रसिकांच्या मनात घर करेल असे गौरवोदगार सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांनी दाणोली येथे काढले.
श्री समर्थ सद्गुरू साटम महाराज यांच्या होऊ घातलेल्या बहुभाषिक मराठी मालिकेच्या सादरीकरणासाठी आवश्यक असलेल्या माहिती पटाचा स्क्रिनिंग सोहळा दाणोली येथे साटम महाराज समाधी मंदिरात पार पडला. या सोहळ्याचे उदघाटन खेम सावंत भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर युवराज लखमराजे सावंत भोसले, ऍड. शामराव सावंत, अनिता जोशी, रवींद्र मोरे, किशोर राऊत, व्यवस्थापक एल. एम. मोरे, रोहिणी सावंत, मालिकेचे लेखक, दिग्दर्शक गुणेश गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक गुणेश गवस यांनी केले. यावेळी श्री समर्थ सद्गुरू साटम महाराज यांच्या जीवनावर आधारित ३५ मिनिटांचा माहितीपट भाविकांनी दाखविण्यात आला.