ओरोस येथे सिंधुरत्न समृद्ध योजना मुख्यालयाच्या उदघाटन समारंभाला दर्शविली उपस्थिती
ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या मुख्यालयाचा उदघाटन समारंभ आज सिंधुरत्न समृद्ध योजना अध्यक्ष दिपक केसरकर यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन योजनेची संपूर्ण माहिती घेतली.यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा, जिल्ह्यातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुरत्न योजनेची स्थापना केली. तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार यांनी हि योजना राबविण्याकरिता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ३ वर्षांसाठी ३०० कोटी रु. मंजूर केले आहेत. सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या मुख्यालयाचे उदघाटन झाल्याचा आपल्याला आनंद असल्याचे सांगत योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सा.बा.कार्यकारी अभियंता कणकवली अजयकुमार सर्वगोड,माजी आमदार प्रमोद जठार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.