गायत्री गंगाराम निगुडकर यांना फरा पुरस्कार जाहीर
सौ. हेमावती स्मृती महिला स्वावलंबन पुरस्काराच्या ठरल्या मानकरी
11 जुलै रोजी वेंगुर्ल्यात पुरस्कारांचे होणार वितरण
दोडामार्ग
महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार प्राप्त दोडामार्ग तालुक्यातील केर गावातील आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या नावे सुरू केलेल्या फरा प्रतिष्ठानचे १४ व्या वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
यंदाच्या १४ व्या वर्षी सौ. हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार गायत्री गंगाराम निगुडकर ( ओंकार प्रिंटिंग प्रेस, मळगाव, ता. सावंतवाडी ) यांना घोषीत करण्यात आला आहे.
गायत्री गंगाराम निगुडकर यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, गौरवग्रंथ, मेडल, सन्मान लोगो प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे
या पुरस्कारांचे वितरण ११ जुलै रोजी वेंगुर्ला येथे होणार आहे. फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी २ मे रोजी होणाऱ्या आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या १४ व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले.