You are currently viewing इचलकरंजीत माझी अक्षरे पुस्तकाचे प्रकाशन

इचलकरंजीत माझी अक्षरे पुस्तकाचे प्रकाशन

इचलकरंजीत माझी अक्षरे पुस्तकाचे प्रकाशन

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील डिझाईन सेंटरचे पद्मकांत मुसळे यांच्या माझी अक्षरे या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर यांच्या हस्ते व
प्रांताधिकारी विकास खरात ,
प्रकाश ऑफसेटचे अरुण खंंजिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी या संघटनेच्या जीवन गौरव पुरस्कार प्रदान व कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.यावेळी बाळासाहेब आंबेकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी पद्मकांत मुसळे यांचे माझी अक्षरे हे विविध कलाविष्काराचे दर्शन घडवणारे कॅलिग्राफी पुस्तक अत्यंत उत्कृष्ट असून ते मुद्रण क्षेञाबरोबरच कला क्षेत्र , विद्यार्थ्यांना कलेचे व कॅलिग्राफीचे बारकावे अभ्यासण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल ,असे गौरवोद्गार काढले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास
प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव साळी , उपाध्यक्ष सिताराम शिंदे , खजिनदार कलगोंडा पाटील ,
सचिव संजय निकम ,
सदस्य विनोद मद्यापगोळ , दीपक वस्ञे , गणेश वरुटे , राकेश रुग्गे , सुधाकर बडवे , दीपक फाटक , रणजीत पाटील , स्वप्नील नायकवडे ,बंटी जैन , नरेंद्र हरवंदे ,माजी सल्लागार पदमाकर तेलसिंगे , सल्लागार दिनेश कुलकर्णी ,संतराम चौगुले , शंकरराव हेरवाडे ,संजय आगलावे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

प्रतिक्रिया व्यक्त करा