पती निधनानंतर ‘पूर्णांगी’ महीलांचा ‘सौभाग्य लेणं देऊन केला सन्मान
विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणान्या परुळेबाजार
परुळे :
ग्रामपंचायतीने सामाजिक क्रांतीचे पाऊल उचलले आहे पती निधनानंतर विधवा झालेल्या महिलांना समाजात ताठ मानाने जगता यावं म्हणुन जुन्या विचारांच्या शृंखला तोडुन या ‘पुर्णागी’ महिलांचा सन्मान सौभाग्याच लेणं देऊन जागतिक महिला दिन एक वेगळ्या सामाजिक उपक्रमातून धाडसीपणे राबविला आहे. ८ मार्च जागतिक महिला दिन परुळे बाजार ग्रामपंचायतीने सलग तीन दिवस या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले.
प्रथम कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विरंगुळा म्हणून विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. १० मार्च रोजी बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला. याच वेळी गावातील ५० पुर्णाांगी महीलांचा सौभाग्य लेणं देऊन सन्मान करण्यात आला.
पती निधनानंतर या महीलांना समाजात जसे सौभाग्यवती स्त्रियांना सन्मान मिळतो त्याप्रमाणे मिळत नाही. हिच सामाजिक प्रवृत्ती कुठे तरी बंद व्हावी यासाठी पहिले पाऊल यामार्फत उचलण्यात आले. ५० महिलांना सौभ्याग्य लेणं प्रदान करण्यात आले. यावेळी या महिलांना भावना अनावर झाल्या. पूर्ण सभागृहाचे वातावरण भावूक झाले. ज्यांना सन्मान मिळाला, त्यांना अश्रु अनावर झाले. या कार्यक्रमाचे वेळी सरपंच श्रीम प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच श्री संजय दूधवडकर, महिला बालकल्याण मुख्यसेविका शर्मिष्ठा सामंत, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी श्री मेघा अंधारे, स्टेट बँक शाखा व्यवस्थापक सौ. बिले, पॅलेस्टिनी श्री परब, ग्रा.पं. सदस्य श्री प्रदीप प्रभू, श्रीम प्राजक्ता पाटकर, सीमा सावंत, तन्वी दुदवडकर, नमिता परुळेकर, पुनम परुळेकर, श्री अभय परुळेेकर, श्री सुनाद राऊळ, माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, माजी सदस्य श्रीम प्रणिता तांडेल, आदिती परुळेकर गितांजली मडवळ यांसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. ग्रामसेवक श्री शरद शिंदे यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक केले. सन्मानाचे कारण विषद केले. यानंतर स्पर्धाचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महिलांसाठी हळदीकुंक समारंभ झालाा. आभार प्रदर्शन सदस्य सुनाद राऊळ यांनी केले.
कोणत्याही महिलेवर किंवा कुटुंबावर वाईट प्रसंग आला तर पती निधनानंतर असहाय्य झालेला महिला आपली मैत्रिण माणून तिला पुन्हा समाजात उभे करण्यासाठी प्रयत्न करा. शासनाच्या महिलांना साठी असणान्या विविध योजनांचा लाभ घ्या. तसेच जुन्या रूढी परंपरा ही चौकट मोडण्याचा प्रयत्न करूया ग्रामपंचायतनी क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. आपण ही सर्वांनी त्याला साथ देऊया असे मत मुख्यसेविका महिला बालकल्याण श्रीम शमिॅष्ठा सामंत यांनी माडले.
ग्रा.पं. परुळे बाजार ने एक चांगला उपक्रम राबविला आहे. परुळे भागतील सर्व ग्रा.प. सतत विविध उपक्रम एकत्रित असतात. त्यामुळे ते चांगले चित्र या भागात मला नेहमीच पाहता येते, असे मत वैद्यकीय अधिकारी श्रीम मेघा अंधारे यांनी मांडले.
आपला माणूस गेल्याच दुःख काय असते आणी त्यानंतर आपला समाज आपल्याला कोणत्या पद्धतीने वागवतो हे मी वयाच्या 19 व्या वर्षापासून अनुभवते आहे. त्यामुळेच आपल्या सारख्या महिलांना समाजात मानाने जगता यावे. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक सामाजिक क्रांतीचे पाऊल उचलत आहोत, त्याला सर्वानी साथ द्या असे विचार माजी सरपंच श्रीम प्रणिती आंबडपालकर यांनी विचार मांङले.
पत्नी निधनानंतर विधवा झालेल्या महीलांना विधवा न संबोधता पूर्णांगी नावाने ओळखले जावे, असे महिला आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी होईल असे मत श्रीम प्राजक्ता पाटकर यांनी व्यक्त केलेे. यावेळी पूर्णांगी मंजुषा चव्हाण यांनी मोजक्या शब्दांत आपल्या भावना मांडल्या. आपला पती जरी जग सोडून गेला तरी आपण त्याचेच नाव लावून जगतो तेव्हा हे ग्रामपंचायतीनेे दिलेले सौभाग्य लेणं हे आपल्या पतीची आठवण म्हणुनच वागवा असे मत व्यते केले. हा कायॅक्रम ग्रामपंचायत परूळेबाजार व गावातील लोकसहभाग व विविध संस्था व बैंक आॅफ महाराष्ट्र परूळे यांच्या सहकार्यातून करण्यात आला. त्या सवाॅचे आभार ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री शरद शिंदे यांनी मानले.