You are currently viewing सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ -पोलीस उपअधीक्षक डॉ.रोहिणी साळुंखे

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ -पोलीस उपअधीक्षक डॉ.रोहिणी साळुंखे

सावंतवाडी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय येथे प्लेक्सस विद्यार्थी संघ २०२३ मार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमातील एक भाग म्हणून महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी डी पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी पोलीस दलाच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. रोहीणी सोळंके उपस्थित होत्या. तसेच सुप्रसिद्ध कवीयत्री, लेखिका डॉ. सई लळीत प्रमुख अतिथी उपस्थित होत्या.

याप्रसंगी डॉ. रोहीणी सोळंके यांनी महिलांच्या विविध समस्या, महिला अत्याचार, महिला सुरक्षा याबाबतीत मार्गदर्शन केले सध्याच्या युगामध्ये मोबाईलचा वापर अतिप्रमाणात केला जात असून सोशल मिडिया आदींच्या अतिवापरामुळे तरुणपीढी बरबाद होत असल्याचे सांगितले तसेच सोशल मिडियाच्या अति वापरामुळे महिला व तरुणीवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे डॉ सोळंके यांनी प्रतिपादित केले.

डॉ. सई लळीत यांनी त्यांच्या स्वरचित मालवणी कविता सादर केल्या. तसेच एक वैद्यकिय व्यावसायिक म्हणून कार्य करत असताना समाजातील महिलांच्या विविध आरोग्य समस्यांविषयी माहिती दिली सिंधुदुर्ग जिल्हयातील महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असून याची वाढती संख्या ही चिंताजनक असल्याचे आधोरेखित डॉ सई लळीत यांनी केले सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी संघ प्रमुख डॉ. सितावार यांनी केले तर निखिल दारिस्तेकर, स्वाती गाडवे, साक्षी देशपांडे, काजल ढाळे, कौसर, मेमन, सकिना खान, जयराज मरकड, शुभांगी घुटे, शिवानी सिंह, आकांक्षा फुके आदित्य कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या सदर प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दळवी प्रा. डॉ. कठाणे प्रा. डॉ. ठाकरे, प्रा. डॉ. सौ . ठाकरे प्रा. डॉ. विठ्ठलानी, प्रा. डॉ. गोळघाटे, प्रा. डॉ. सौ. पाटील प्रा. डॉ. राजेंद्र पाटील व महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी, प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा