You are currently viewing बांद्यात क्रिएटिव्ह सखी ग्रुपतर्फे महिलांचा विशेष सन्मान

बांद्यात क्रिएटिव्ह सखी ग्रुपतर्फे महिलांचा विशेष सन्मान

बांद्यात क्रिएटिव्ह सखी ग्रुपतर्फे महिलांचा विशेष सन्मान

बांदा

स्वतःच्या पायावर उभे राहताना वेगळं काहीतरी करून दाखविताना समाजातील विविध घटकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ही जेव्हा ध्येय बनते, सातत्याने त्यादिशेनेच प्रत्येक पाऊल टाकले जाते, तेव्हा असे कार्य समाजाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शन करणारे ठरते असे प्रतिपादन सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे केले.

समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील क्रियेटिव्ह सखी ग्रुपच्या वतीने करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्रीमती नाईक बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर तलाठी वर्षा नाडकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा मराठा समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ. स्वाती सावंत, दैवज्ञ समाज महिला मंडळ अध्यक्षा धनश्री धारगळकर, पाटेश्वर महिला मंडळ अध्यक्षा प्रियांका हरमलकर, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. गीता गर्दे, सखी ग्रुपच्या अध्यक्षा अंकिता स्वार आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व केक कापून महिला दीन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी गृह उद्योग करणाऱ्या मीना नाटेकर, उमांगी मयेकर,साक्षी वाळके, सौ मंजू साळगावकर, विप्रा सावंत, प्रियांका नाटेकर, चित्रा भिसे, शांभवी गायतोंडे, मानसी मयेकर, सरोज येडवे, शैक्षणिक क्षेत्रातील भक्ती महाजन, रीना मोरजकर, स्नेहा पावसकर, अभिनय क्षेत्र गौरी बांदेकर, अवंती पंडित, रूपाली सावंत, प्लास्टिक वापर टाळणाऱ्या महिला गायत्री भांगले, मराठी सिने, मालिका अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, घरकाम करणाऱ्या श्रीमती सुनिता मुळ्ये व श्रीमती रेणुका वडार, सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्या शिल्पा परब, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, रिया येडवे, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी पटेकर, रुपाली शिरसाट, देवल येडवे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

वर्षां नाडकर्णी म्हणाल्या की, जागतिक महिला दिनामुळे आज आपल्याला महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे हे प्रकर्षाने दिसून येते मात्र हे केवळ एक दिवसापूर्वी सीमित न राहता दररोज महिलांच्या कर्तृत्वाला वाव दिला पाहिजे आणि ती मानसिकता आपण जोपासली पाहिजे. यावेळी श्वेता कोरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रस्ताविकात रिया वाळके यांनी महिलांसाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून मंडळाच्या दशकपूर्ती निमित्त स्थानिक महिलांना व्यासपीठ निर्माण होण्यासाठी भव्य सौभाग्यवती सुंदरी २०२३ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. आभार रुपाली शिरसाट यांनी मानले.यावेळी मंडळाच्या वंदना पावसकर, साधना पांगम, सिंधीया पावसकर, सपना विरनोडकर, निनता गोवेकर, सोनाली राणे, सावली कामत, श्रिया गोवेकर, तन्वी काणेकर, जयश्री गोवेकर, सिद्धी पावसकर, श्रुती गोवेकर, सायली विरनोडकर, मृणाल तोरसकर, रेश्मा राजगुरू, माधुरी पावसकर, चित्रा भिसे यासंह महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा