You are currently viewing महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार

*महात्मा ज्योतिराब फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा १.५० लाखांहून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. या योजनेचा लाभ अशा प्रकारे घ्यावा.*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महात्मा ज्योतिराब फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा १.५० लाखांहून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.

त्याशिवाय नवीन २०० रुग्णालयांचा यात समावेश करण्यात येणार आहे. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून ४ लाखांपर्यंत मर्यादा वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात ७०० दवाखाने उघडण्यात येण्याची शक्यता आहे.

*महात्मा ज्योतिराब फुले जनारोग्य योजना*

राज्यातील दारिद्ररेषेखालील विशेषकरुन पिवळी शिधापत्रिका धारकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने २ जूलै २०१२ रोजी राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली. पुढे २१ नोव्हेंबर २०१३ ला राज्यातील २८ जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला. त्यानंतर या योजनेचे ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ असे नामकरण करण्यात आले. सध्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना होत असून त्सासाठी पात्रता कोणती ते जाणून घ्या.

– या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिका, अत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना तसेच केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.

– शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथालयातील मुले, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषांनुसार पात्र पत्रकार व त्यांचे कुटुंब तथा कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

*या आरोग्य सेवांचा समावेश*

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी ३४ निवडक विशेष सेवांतर्गत ९९६ प्रकारच्या गंभीर तसेच खर्चिक शस्त्रक्रियां आणि त्यावर उपचार करता येतात.

*ओळखपत्र*

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ओळखपत्र दिले जाते. आपातकालीन स्थितीत हे ओळखपत्र नसल्यास शिधापत्रकासह छायाचित्रासह असणारे कोणतेही ओळखपत्र आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना चालू शकतो.

*आरोग्य मित्राच्या मदतीने नोंदणी करावी*

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयांत आरोग्य मित्र असतात. हे आरोग्यमित्र संबंधित व्यक्तींची आँनलाईन नोंदणी करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा