सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूचे लिलाव लवकरात लवकर लावण्यात यावे व वाळूवर लावण्यात आलेली वाढीव राॅयलटी कमी करावी अशी मागणी महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली काॅग्रेसच्या शिष्टमंडळाने मा. ना. बाळासाहेब थोरात यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वरील मागणी केली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मा. ना. बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्याबरोबर लवकरात लवकर बैठक आयोजित करून राॅयलटी कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, सचिव आनंद परूळेकर, सुरेश काटकर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूचे लिलाव लवकरच……..
- Post published:ऑक्टोबर 30, 2020
- Post category:बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments