*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”ती स्त्री आहे”*
————————
ती स्त्री आहे
जगतजननी,
रणरागिणी
हो ,ती महिला आहे…….
ती आदिशक्ती
ती नारीशक्ती
चंचला, सहचारीणी
तीच गृहलक्ष्मी आहे…….
आ…..आत्मा,. ई….ईश्वर
एक परमेश्वर ही तीच
हीरकणी ती, यशोदा ,सीता, मीरा ती
सावित्री, जीजा, तारा, लक्ष्मीबाई तीच……..
ती विश्वनिर्मीती
ती अबोल प्रीती
तीच अन्नदाती
आभाळ तीच, तीच धरती…..
हो ती स्त्री आहे,
नारी रुपी नारायणी आहे,
सबला, सक्षम, कोमल आहे
पण तीच वात्सल्य मूर्ती आहे….
हो तीच स्त्री आहे, तीच स्त्री आहे…
*योगिनी वसंत पैठणकर*
नाशिक