जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व विविध कार्यक्रम
कणकवली
जागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठानतर्फे येथील लक्ष्मी हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गवाणकर, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, नगरसेविका सुप्रिया नलावडे, कविता राणे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर, माजी पं. स. सदस्या हर्षदा वाळके, भाजप शहराध्यक्षा प्राची कर्पे, प्रियाली कोदे, हर्षदा वाळके, विनिता बुचडे, राजश्री धुमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरातील महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पदर प्रतिष्ठान काम करीत आहे. महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरु केला पाहिजे, ज्या महिला स्वयंरोजगार सुरु करणार आहेत, त्यांना पदर प्रतिष्ठानतर्फे सहकार्य करेल, अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली शहरात ८७ बचत गट असून बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला मार्केट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बचत गटामध्ये काम करणाऱ्या ५०० महिलांनी एकत्र येऊन मोठा उद्योग सुरु केला पाहिजे हा उद्योग सुरु करण्यासाठी आपण जे सहकार्य आवश्यक आहे, ते न.पं. तर्फे केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिलांना दिशा देण्याचे काम पदर प्रतिष्ठान करीत आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
भाजपच्या दिवंगत नेत्या स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये डॉ. अश्विनी नवरे, डॉ. प्रिती पावसकर, उज्वला धानजी, नयना अभिजित मुसळे, स्नेहलता राणे यांचा समावेश होता. याशिवाय काबाडकष्ट करुन नवऱ्याच्या पश्चात किंवा कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा भार उचलून मुलांना शिक्षण देणाऱ्या स्नेहा सातबसे, रश्मी परब, उमा घाडी, विजया सरुडकर- शेट्ये, साक्षी शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर पदर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सादर केले. सूत्रसंचालन सुप्रिया नलावडे यांनी केले. आभार मेघा गांगण यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गव्हाणकर, सुप्रिया नलावडे, संजीवनी पवार, संगीता बेलवलकर, अंकिता कर्पे, भारती पाटील, विनिता राणे, राजश्री परब, स्मिता पावसकर, सोनाली परब, स्मिता कामत, मनीषा गोवेकर, स्नेहलता राणे, रंजना कुडरतरकर, वैजयंती मुसळे यांच्यासह पदर प्रतिष्ठानच्या सदस्या उपस्थित होत्या.
चेतना मंगे, प्रियाली कोदे प्रथम
यानिमित्ताने घेतलेल्या पाककला स्पर्धेत चेतना मांगे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मिताली माणगावकर हिने द्वितीय तर शिवप्रिया हिर्लेकर तृतीय क्रमांक मिळवला. शर्वरी जाधव व मंजिरी वारे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या स्पर्धेचे परीक्षण अमित टकले आणि प्रवीण तायशेटे यांनी केले. बेस्ट आऊट ऑफ वेस्ट स्पर्धेत प्रियाली कोदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आस्मा बागवान यांनी द्वितीय तर उज्वला धानजी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे परीक्षण अर्पिता मुंबरकर यांनी केले. रस्सीखेच स्पर्धेत यंगस्टार ग्रुप विजेता तर साज महिला ग्रुप उपविजेता ठरला.