You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण तालुक्यातील रस्त्यांसाठी १५ कोटी ९९ लाख रु निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण तालुक्यातील रस्त्यांसाठी १५ कोटी ९९ लाख रु निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मालवण तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १५ कोटी ९९ लाख रु निधी मंजूर करण्यात आले आहेत.
त्यामध्ये तेरई जोड रस्ता (ग्रा. मा. ५८ ) ४.३०० कि.मी. साठी ६ कोटी १० लाख रु., आनंदव्हाळ कातवड नांदरुख रस्ता ( ग्रा. मा.२७८) ३ कि.मी.साठी २ कोटी ४० लाख रु., किर्लोस आंबवणे खांदारवाडी रस्ता ( ग्रा.मा.११९,१२०) २.५०० कि.मी.साठी २ कोटी ४२ लाख रु., खैदा साळकोंबा नांदरूख रस्ता ( ग्रा. मा.-२४६) २.६०० कि.मी.साठी १ कोटी ९८ लाख रु., मसुरे डांगमोडे बेलाचीवाडी विरण रस्ता ( ग्रा. मा. ९१) ३.५०० कि.मी.साठी ३ कोटी ८ लाख रु.हि कामे मंजूर झाली असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ८ मार्च २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा