कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय संस्थापक अध्यक्ष लोककलाकार *पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री परशुराम विश्राम गंगावणे* यांच्या संकल्पनेतुन प्रथमच ठाकर आदिवासी लोककला *चित्रकथी* या चित्रशैली मधुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट दाखविणारे चित्र तयार करण्यात आलेले आहे. घड्याळाच्या आकारामध्ये असलेल्या या चित्रामध्ये *छत्रपती शिवाजी महाराजांचा* जन्म ते शिवराज्याभिषेक या विषयावर एकुण 12 वेगवेगळी चित्रे तयार करण्यात आलेली आहेत.
ठाकर आदिवासी चित्रकथी हि लोककला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये गुप्तहेरी करणेसाठी वापरली जात असे. या चित्राचे प्रदर्शन दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन येथे होणार आहे असे यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी सांगितले. सध्या हे चित्र पाहण्यासाठी ठाकर आदिवासी कला आंगण कला दालन पिंगुळी येथे उपलब्ध आहे असे गंगावणे यांनी यावेळी सांगितले. या चित्र तयार करणेकामी एकनाथ गंगावणे, चेतन गंगावणे, अक्षय मेस्त्री, प्रविण गंगावणे यांचे सहकार्य लाभले.