आंबोली :
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज आंबोलीच्या तीन विद्यार्थ्यांची अलीकडेच भारतीय सैन्य दलात SSB साठी निवड करण्यात आली होती. पुन्हा अजून यामध्ये कॅडिट अर्थव घोड़ी परब आणि कॅडेट निशांत निशेल मोरे या दोन विद्यार्थ्याची SSB साठी निवड करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष मा.पि. एफ. डॉन्टससर संचालक आणि शिक्षक यांचेकडून या विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यता आले. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल हि सैनिकी शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी जिल्हयातील एकमेव शाळा आहे. सलग १९ वर्ष शिस्तप्रिय सक्षम साहसी विद्यार्थी घडविण्याचे अविरत कार्य करीत आहे. या यशात भर घालत अजून दोन विद्यार्थ्यांनी १२ वी नंतरच्या १०+२ Technical Entry च्या (SSB) मुलाखतीसाठी निवड झाली आहे. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेणारे विद्यर्थ्यां १२वी नंतरही आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहतात. भारत सरकारच्या रक्षा मंत्रालया मार्फत सेवा निवड समिती (SSB) व्दारे देशभरावून उच्च पदस्थ अधिकारी निवड करण्यासाठी मुलाखत घेतली जाते. विद्यार्थी थेट SSB साठी निवडले जातात. यामध्ये सैनिक स्कूलच्या या दोन विद्यार्थ्यांनी आणखीनच भार घातली आहे. आतापर्यंत १४ विद्यर्थी NDA लेखी परिक्षा उत्तीर्ण झाले असून २२ विद्यर्थी SSB साठी पात्र ठरले आहेत. एकूण १९ विद्यार्थी भारतीय सैन्यात वेगवेगळ्या पदावर देश सेवा बजावत आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्याचे कौतूक संस्थेचे अध्यक्ष श्री पि. एफ. डॉन्टस सचिव श्री सुनिल राऊळ संचालक श्री जॉय डॉन्टस कार्यालयिन सचिव श्री दिपक राऊळ सर्व संचालक प्राचार्य श्री नितीन गावडे व शिक्षकांकडून केले जात आहे.