You are currently viewing मालवणात मतदान जन जागृतीपर पथनाट्य कार्यक्रम संपन्न 

मालवणात मतदान जन जागृतीपर पथनाट्य कार्यक्रम संपन्न 

मालवणात मतदान जन जागृतीपर पथनाट्य कार्यक्रम संपन्न

निवडणूक आयोगाचे निर्देश आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आयोजीत प्रबोधन पंधरावडा उपक्रम.

मालवण :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल १८ एप्रिलला सायंकाळी मालवण फोवकांडा पिंपळ, भरड नाका आणि मालवण एस टी स्टॅण्ड येथे निवडणूक जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदान जनजागृती, तसेच मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी पंधरावडा साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे, सिंधुदुर्ग यांजकडून सूचनेनुसार मालवण शहरात १० एप्रिल पासून पासून विविध कार्यक्रम (मतदार सेल्फी पॉईट, मतदार स्वाक्षरी मोहिम) आयोजित करण्यात आले.

मालवण फोवकांडा, भरड नाका व मालवण एस टी स्टॅण्ड येथे मालवण नगरपरिषदेमार्फत आरोस येथेल आर्टस, कॉमर्स, कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मतदार जनजागृती करीता पथनाटय आयोजित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमांच्या वेळी मालवण नगरपरिषद कर्मचारी व मालवण शहरातील नागरीक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा