You are currently viewing तारकर्ली ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवावे…

तारकर्ली ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवावे…

मनसे देवबाग तारकर्ली विभाग अध्यक्ष बजरंग कुबल

मालवण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवबाग तारकर्ली विभाग अध्यक्ष बजरंग कुबल यांनी तारकर्ली ग्रामपंचायत येथे कचरा व्यवस्थापन संदर्भात एक आग्रही मागणी केली आहे. यासंदर्भात त्यानी तारकर्ली ग्रामपंचायतीला एक निवेदन सादर केले आहे सदर निवेदनात असे म्हटले आहे की आपल्या तारकर्ली गावात अनेक दिवसापासून कचऱ्याच्याचे प्रमाण खूपच वाढत आहे त्यातून निर्माण होणारा उग्रवास जनतेच्या आरोग्यास हानिकारक आहे.कचरा रस्त्यावर येण्याचे प्रमाण व वाहतूक करायला येणारी अडचण ही अतिशय त्रासदायक आहे.

आपला जिल्हा व आपला तारकर्ली गाव प्रामुख्याने पर्यटन क्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो त्यातच मिशन बिगीन अंतर्गत सर्व खुले केल्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे गावातील पर्यटन व्यवसाय टिकवण्यासाठी व इतर गोष्टीं सोबतच स्वच्छता ही खूपच महत्त्वाची आहे तरी सौंदर्यपूर्ण असलेल्या तारकर्ली गावची सुंदरता अशा कचर्‍याच्या ढिगार्‍यामुळे धोक्यात येऊ शकते.

ग्रामपंचायतीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे व्यवस्थापन नाही. म्हणून या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी आणि आपल्या तारकर्ली या गावाची सुंदरता तशीच टिकून राहावी प्रसंगी कचरा व्यवस्थापनासंदर्भात तारकर्ली ग्रामस्थ, हॉटेल,पर्यटन व्यावसायिक सर्व दुकानदार जलक्रीडा व्यावसायिक यांची संयुक्त बैठक ग्रामपंचायतीने आयोजित करावी व कचरा व्यवस्थापन नियोजन अधिक प्रभावीपणे करावे अशी तारकर्ली देवबाग विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमची आग्रही मागणी आहे. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष तारकर्ली-देवबागचे बजरंग कुबल, शाखाध्यक्ष तारकर्ली प्रसाद बापर्डेकर,मनसे विद्यार्थी सेनेचे तारकर्ली-देवबाग विभाग अध्यक्ष प्रतिक कुबल,दत्तराज चव्हाण,सिद्धेश मयेकर आदी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा