You are currently viewing लेखक सुधीर शेरे यांच्या ‘एक होती गंगा’ कथासंग्रहाचे होणार प्रकाशन

लेखक सुधीर शेरे यांच्या ‘एक होती गंगा’ कथासंग्रहाचे होणार प्रकाशन

ठाणे :

सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा , ठाणे या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक कवी – कथाकार सुधीर शेरे यांचा ‘ एक होती गंगा ‘ हा समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर. या प्रकाशनाने प्रकाशित केलेला कथासंग्रह रविवार दि.१२ मार्च २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे. गतवर्षी सुधीर शेरे यांचा ‘वेस’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून काव्यरसिकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय पुरस्कार ‘वेस’ ला लाभला आहे.

‘एक होती गंगा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक संजय गवांदे (मुंबई) यांचे हस्ते होणार असून या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रा. डाँ. सुभाष वाघमारे, मराठी विभाग प्रमुख छ.शिवाजी काॅलेज सातारा, प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत गायकवाड, (मुखेड), समीक्षक प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर (मिरज), डाँ. उत्तम सूर्यवंशी पोलीस निरीक्षक (सातारा) मर्जिना मणेर (तुमकुर, कर्नाटक) हे मान्यवर वक्ते उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंवादन प्रसिद्ध सूत्रसंचालक व व्याख्याते मारुती शेरकर (मुंबई) हे करणार आहेत. १२ मार्च रोजी सायंकाळी ठिक पाच वाजता, गुगल मीटवर आँनलाईन होणा- या व युट्युबवर लाईव्ह असणा-या या सोहळ्याची तांत्रिक बाजू साभाळणार आहेत. वसुंधरा मित्र मिलिंद पगारे ( नाशिक) कथा संग्रहातील काही कथा चवणेश्वर ता. कोरेगाव जि. सतारा या गावच्या पंचक्रोशीतील बोली भाषेत आणि काही नागर भाषेत आहेत. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही साहित्य रसिकांची पसंती कथांना लाभत आहे.

साहित्य रसिकांना साहित्य परिचय व समीक्षा रुपी मेजवानी या कथासंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मिळणार आहे. सोहळा पाहण्यासाठी साहित्य रसिकांना युट्युब ची लिंक दिली जाणार आहे. रसिकांनी हा प्रकाशन सोहळा पहावा, अनुभवावा, आनंद घ्यावा, असे आवाहन कवी – लेखक सुधीर शेरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा